Others News

गेल्या मागच्या वर्षापासून कोरोना महामारी मुळे अनेक जणांच्या नोकरीवर गदा आली. बरेच तरुण बेरोजगार झाले. बरेच उद्योगधंदे ही अडचणीत आल्यामुळे कामगार कपात, वेतन कपात इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधार्थ बाहेर पडणाऱ्या तरुणांना तर अधिक बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

Updated on 27 June, 2021 1:43 PM IST

 गेल्या मागच्या वर्षापासून कोरोना महामारी मुळे अनेक जणांच्या नोकरीवर गदा आली. बरेच तरुण बेरोजगार झाले. बरेच उद्योगधंदे ही अडचणीत आल्यामुळे  कामगार कपात, वेतन कपात इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधार्थ बाहेर पडणाऱ्या तरुणांना तर अधिक बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

 अनेक तरुणांचे शासकीय नोकरी करावी असे स्वप्न असते. तर या स्वप्नाला पूर्ण करण्याची संधी रेल्वेने उपलब्ध करून दिली.NEWS18 लोकमत च्या बातमी नुसार, रेल्वे खात्यात ट्रॅक मेंटेनर  पदासाठीभरती प्रक्रिया सुरू करण्यात येऊन रेल्वे भरती मंडळाकडून लवकरात लवकर ग्रुप डी साठीअर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

 या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

 ज्या उमेदवारांनी माध्यमिक शिक्षण आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला असेल उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकता.

 आयटीआय विद्यार्थ्यांनी ज्या ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण केले असेल त्यात संबंधित ट्रेड साठी आयटीआय उमेदवार पात्र ठरणार आहेत. उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत ची पूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 तर जास्तीत जास्त 33 असावे. उमेदवारांनी भरती संदर्भातल्या नोटिफिकेशनपाहून सविस्तर माहिती घ्यावी.

 अर्ज कसा करावा?

 उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळाचे संकेतस्थळ http://www.rrbcdg.gov.in यावर भेट देऊ शकतात.

तसेच उमेदवार रेल्वेच्या वेगवेगळ्या आर आर बी वेबसाईट वरून हि या भरती संबंधित माहिती मिळू शकतात. उमेदवारांनी पदभरती संबंधीचा अर्ज हा अधिकृत वेबसाइटवरून अर्ज भरावा.

 पदसंख्या

रेल्वे भरती मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील विविध विभागातील सर्व पदे मिळून ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV ची एकूण पदे ही 40712 आहेत. ही सर्व पदे इंजीनियरिंग डिपार्टमेंट मध्ये भरली जातील. पदांच्या संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर  भेट देऊन इत्थंभूत माहिती घ्यावी.

English Summary: railway recruitment
Published on: 27 June 2021, 01:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)