Others News

मुंबई- सोशल मीडियाच्या व्याप्तीमुळे जग एक खेड बनलं आहे. त्यामुळे लोकल उत्पादनांना ग्लोबल पातळीवरील पोहचणे शक्य झाले आहे. सध्या मायेची ऊब देणारी पारंपरिक गोधडी ट्रेंडिंगचा विषय ठरत आहे. अनिवासी भारतीयांसोबत विदेशी नागरिकांना गोधडीचे आकर्षण पहायवास मिळत आहे. बहुराष्ट्रीय ई-कॉर्मर्स (e-commerce) कंपन्यांच्या ऑनलाईन विक्रीच्या प्लॅटफॉर्मवर गोधडी साठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

Updated on 26 September, 2021 9:25 PM IST

मुंबई- सोशल मीडियाच्या व्याप्तीमुळे जग एक खेड बनलं आहे.  त्यामुळे लोकल उत्पादनांना ग्लोबल पातळीवरील पोहचणे शक्य झाले आहे. सध्या मायेची ऊब देणारी पारंपरिक गोधडी ट्रेंडिंगचा विषय ठरत आहे. अनिवासी भारतीयांसोबत विदेशी नागरिकांना गोधडीचे आकर्षण पहायवास मिळत आहे. बहुराष्ट्रीय ई-कॉर्मर्स (e-commerce) कंपन्यांच्या ऑनलाईन विक्रीच्या प्लॅटफॉर्मवर गोधडी साठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

गोधडी (godhadhi) हे कापडाचे तयार केलेले अंथरूण किंवा पांघरूण आहे. जुनी कापडे किंवा कपडे वाया जाऊ नयेत म्हणून ते एकत्र करून आणि धुवून त्याची गोधडी बनवतात. पारंपरिक पद्धतीत गोधडी सुई-दोरा वापरून, सर्व कापडे व्यवस्थित अंथरून छोटे-छोटे टाके घालून शिवली जाते. ती आयताकार असते. त्याच्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कपड्याने नक्षी काढतात. तिला बाहेरच्या बाजूने कापणीच्या आकाराची नक्षी लावली जाते. गोधडी वर नाव किंवा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या ही लावतात. शिवणयंत्रावरही गोधड्या शिवता येतात.

विशिष्ट प्रकारची शिवण, कलात्मक कलाकुसर यामुळे गोधडीची अनेकांना भुरळ पडते.  विविध रंगी कापडांपासून बनविलेली गोधडी ही महाराष्ट्राचे कलात्मक वैभव आहे.

बचतगटांची आर्थिक उन्नती:

महाराष्ट्रातील अनेक महिला बचतगटांना आर्थिक उन्नतीचे साधन गोधडी निर्मितीतून मिळाले आहे. मुलभूत प्रशिक्षण व साधनांसह महिला गोधडीच्या निर्मितीत पारंगत झाल्या आहेत. पालघर तसेच वाडा परिसरातील अनेक महिला बचतगट गोधडी निर्मितीत सक्रिय आहेत.

गोधड्यांना ‘कॉर्पोरेट’ लूक:

पारंपरिक गोधडीत कलात्मक बदल करून गोधडीला कॉर्पोरेट लूक देण्यात आला आहे. ई-कॉमर्स वेबसाईटवर अशा स्वरुपाच्या गोधडींना सर्वाधिक मागणी आहे. आकार व कलात्मक स्वरुपानुसार गोधडींची मागणी नोंदविली जाते. तीनशे रुपयांपासून विविध किंमतीच्या गोधडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

गोधडीला सरकारी सहाय्य:

ग्रामीण भागातील महिलांचे बचतगटांच्या माध्यमातून संघटन करून नेतृत्व, आर्थिक साक्षरता व व्यावसायिक कौशल्य अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून त्यांना व्यावसायिकतेची जोड देण्याचा उपक्रम ग्रामविकास विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे

महाराष्ट्राचं नावीण्य:

भारतातील प्रत्येक राज्यात जवळपास गोधडी किंवा रजया तयार करण्याची परंपरा आहे. प्रत्येक राज्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा वापर करून कलात्मकता साधली जाते.  महाराष्ट्रातील गोधड्यांमध्ये मूळ रंगाचा वापर अधिक केलेला असतो. आधुनिकतेच्या जगात गोधडी निर्मिती कलेची जपवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. 

English Summary: quilt go to london facination to abroad
Published on: 26 September 2021, 09:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)