फाटलेल्या नोटा एक प्रमुख समस्या आहे. नॉट थोडी तरी फाटलेली असली तरी दुकानदारघेत नाही. बऱ्याचदा फाटलेल्या नोटा कोणी न घेतल्यामुळे अशाच घरात पडून असतात. परंतु अशा फाटलेल्या नोटा जर असतील तर त्याची चिंता करण्याची गरज नाही.
कारण अशा फाटलेल्या नोटा तुम्ही बँकेतून सहजरित्या बदलू शकता. या लेखात आपण फाटलेल्या नोटा बँकेतून कसे बदलता येतात याबद्दल माहिती घेऊ.
बँकेची प्रोसेस
रिझर्व बँक ऑफ इंडिया त्यामध्ये प्रत्येक बँकेला अशा फाटलेल्या जुन्या किंवा खराब झालेल्या नोटा स्वीकारावे लागतात.त्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या बँक शाखेला भेट देऊन अशा नोटा सहजपणे बदलता येतात. यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाहीत.
तसेच तुम्ही त्यासंबंधित बँकेचे ग्राहक असणेही गरजेचे नाही.परंतु यामध्ये लक्षातघेण्यासारखी बाब म्हणजे ग्राहक बँकेला नोटा बदलण्यासाठी सक्ती करू शकत नाही. हे सर्वस्वी बँकेवर अवलंबून आहे की ती बदलावी का नाही. बँक अशा नोटा घेताना ते व्यवस्थित तपासते. म्हणजे संबंधित नॉट मुद्दाम फाडलेली नाही ना? याशिवाय त्या नोटेची स्थिती कशी आहे? इत्यादी तपासून नंतर बँक ते बदलून देते.
बँक कोणत्या नोटा बदलू शकत नाही?
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार जळालेल्या, जास्तच फाटलेल्या किंवा तुकडे झालेल्या नोटा बदलल्या जाऊ शकत नाही. या नोटा फक्त रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या इशु ऑफिस मध्ये जमा करतायेतात.
किंवा अशा नोटांचा वापर करून तुम्ही तुमचे बिल किंवा टॅक्स बँकेमध्ये भरू शकता. अशा नोटा तुम्ही तुमच्या खात्यात जमा करू शकता.
जुन्या नोटा बदली केल्यानंतर किती पैसे मिळतात?
रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नियमानुसार वीस रुपयांपर्यंतच्या नोटांमध्ये अर्धे पैसे देण्याची तरतूद नाही या प्रकरणात पेमेंट पूर्ण केले जाते. तसेच पन्नास ते दोन हजार रुपयांच्या नोटा बदलायचे असतील तुम्हाला त्या नोटांच्या बदल्यात अर्धे पैसे देण्याची तरतूद आहे.
( संदर्भ- झी 24 तास )
Published on: 29 September 2021, 03:12 IST