केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान किसान योजनेचा आठवा हप्ता सरकारकडून लवकरच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये विभागून देत असते.
त्यानुसार दर वर्षाचा पहिला हप्ता हा एक एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता हा एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आणि तिसरा हप्ता एक डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो.जर तुम्ही अजून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर 31 मार्चपूर्वी रजिस्ट्रेशन करण्याची संधी आहे. जर तुम्ही 31 मार्चपूर्वी रजिस्ट्रेशन केले आणि आपला अर्ज स्वीकारला गेला तर होळी नंतर आपल्याला दोन हजार रुपये मिळतील असे त्याचबरोबर एप्रिल किंवा मे महिन्यात येणाऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळतील..
रजिस्ट्रेशन कसे करावे?
या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आगोदर योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे गेल्यावर फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करून तेथे न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय येईल. यावर क्लिक केल्यानंतर तिथे आधार क्रमांक टाकावा लागेल. यासह कॅपच्या कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडावे लागेल. हा फॉर्म भरताना तुम्हाला तुमची सगळी वैयक्तिक माहिती भरावी लागते तसं बँक खात्याचा तपशील आणि शेतमालाचे संबंधित माहिती भरावी लागेल. ही सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून तो फॉर्म सबमिट करावा लागेल.
या योजनेसाठी नोंदणी करणे फार सोपे आहे तुम्ही घरी बसल्या सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत पूर्वी काही काही चुका झाल्या असतील, त्या चुका सुधारण्याचे सरकारने ठरवले आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा अर्थात त्यांचा भूखंड क्रमांक नमुद करावा लागेल.
Published on: 17 March 2021, 10:41 IST