प्रधानमंत्री कुसुमयोजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून भारतातील दुर्गम भागातीलशेतीला जलसिंचनाची सोय सहज उपलब्ध व्हाव्याततसेच नापीक आणिशेतीसाठी वापरास योग्य नसलेल्या जमिनीचा वापर करून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याच्या उद्देशानेकेंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळेल उत्पन्न
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.प्रधानमंत्री कुसुम योजनेद्वारे स्थापन केलेल्या सौर प्रकल्पामध्ये तयार होणारी अतिरिक्त वीज महावितरणलाविकूनकिंवा या प्रकल्पासाठी स्वतःची जमीन भाडेपट्ट्याने देऊ शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण होणारआहे. तसेच भारतातील बऱ्याच अशा दुर्गम भागांमध्ये विजेची सोय नसल्याने अशा दुर्गम भागासाठी ही योजना नवसंजीवनी ठरणार आहे. अशा दुर्गम भागांमध्ये सौर पंपाची उभारणी करून पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया
प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत 0.5 ते दोन मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रिकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने शेतकरी सहकारी संस्था,पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था आणि पाणी वापरकर्ता संघटना, शेतकरी विकसित करू शकता.या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्थाकरण्यास सक्षम नसल्यास ते सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकणार आहेत.
अशा परिस्थितीमध्ये भाडेपट्टी कराराद्वारे मूळ जमीन मालकाला त्याच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे यात महत्त्वाचे म्हणजे हा सौर ऊर्जा प्रकल्प जमिनीवरीलसौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी स्टील्ट रचना वापरून करणार आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा वापर भाडेपट्टा व्यतिरिक्त इतर पिके घेण्यासाठी सुद्धा करता येऊ शकतो.या योजनेमध्ये शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासका द्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरण मार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतात.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?
या योजनेद्वारे निविदा द्वारे भाग घेता येईल.
- शेतकरी
- पंचायत
- शेतकरी सहकारी संस्था
- शेतकरी उत्पादक संस्था
- पाणी वापर करता संघटना
इत्यादी घटकांसाठी कुठल्याही प्रकारचे
या योजनेत सहभागी होण्याचे मुदत
या योजनेअंतर्गत महावितरणने 487 मेगावॅट करिता निविदा जाहीर केल्या आहेत. निविदा भरण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे. विविध भाग घेण्यासाठी महावितरणच्या www.etender.mahadiscom.in/eatAppया संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना 2021 ला14 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे.
https://www.mahaurja.com/meda/en/nodeया लिंक वर जाऊन इच्छुकांसअर्ज करता येणार आहे.( साभार-tv9 मराठी)
Published on: 26 September 2021, 11:00 IST