Others News

सरकारने सर्वांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजेच PMJJBY आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजेच PMSBY सुरू केली होती.

Updated on 03 June, 2022 8:23 PM IST

 सरकारने सर्वांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजेच PMJJBY आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजेच PMSBY सुरू केली होती.

गेल्या 7 वर्षात जे झाले नाही ते आता घडले आहे. म्हणजे सरकारने या दोन्ही विमा योजनांच्या प्रीमियम मध्ये वाढ केली आहे. आता या दोन्ही योजनांच्या खरेदीदारांना दररोज 1.25 रुपये खर्च करावे लागतील. या दोन्ही विमायोजना बँकांच्या खातेदारांना दिल्या जातात. आणि प्रीमियमची रक्कम ही या खात्यातूनच आपोआप कापली जाते.

 प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 330 रुपयावरून 436 रुपये आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 12 वरून 20 रुपये करण्यात आला आहे. प्रीमियम चे हे नवे दर 1 जून पासून लागू झाले आहेत. आता जाणून घेऊया प्रीमियम वाढल्याने किती लोक प्रभावीत होतील.

नक्की वाचा:Aadhar Card: तुमचे आधार कार्ड बनावट तर नाही ना? जाणुन घ्या बनावट आधार कार्ड ओळखण्याची प्रोसेस

PMJJBY हे देशभरात 6.4 कोटी ग्राहक आहेत

 अर्थमंत्रालयाच्या मते 31 मार्च 2022 पर्यंत PMJJBY कडे 6.4 कोटी आणि पमसबी 22 कोटी आहेत. वित्त मंत्रालयाने असेही सांगितले आहे की PMSBY ची स्थापना झाल्यापासून 31 मार्च 2022 पासून, प्रीमियम म्हणून 1,134 कोटी रुपये जमा झाले आहेत. आणि 2,513 कोटी रुपयांचे दावे अदा करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे PMJJBY मध्ये प्रीमियम म्हणून 9,737 कोटी रुपये जमा करण्यात आले आणि 14,144 कोटी रुपयांचे दावे अदा करण्यात आले.

 प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेच्या ग्राहकाच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना 2 लाख रुपये दिले जातात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत, विमाधारक व्यक्तींचा अपघात मृत्यू झाल्यास किंवा अपंग झाल्यास, त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

नक्की वाचा:पिकविमा योजना 2021: 2021 मध्ये पिकविमा योजनेत सहभागी साडेनऊ लाख शेतकऱ्यांना 422 कोटी रुपयांचा होणार फायदा

 दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सुरू केलेल्या या विमा योजनांचे प्रीमियम का वाढवावे लागले? यावर, अर्थमंत्रालयाचे म्हणणे आहे की, अलीकडच्या काळात दोन्ही योजनांमधील दाव्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रीमियम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 2015 मध्ये, दोन्ही योजना सरकारने सुरू केल्या होत्या.

 वित्त मंत्रालयाने सांगितले होते की 2015 मध्ये जेव्हा या दोन्ही योजना सुरू केल्या गेल्या तेव्हा अनुभवाच्या आधारे त्यांचा वार्षिक प्रीमियम दावा निश्चित करण्यात आला. 31 मार्च 2022 पर्यंत PMJJBY चे दाव्याचे प्रमाण 221 टक्‍क्‍यापेक्षा जास्त आहे.

हे क्लेम रेशो काय आहे तेही समजून घेऊ म्हणजे, घेतलेल्या प्रीमियम च्या तुलनेत कंपनीने भरलेल्या दाव्यांच्या संख्येला क्लेम रेशो म्हणतात. समजा एखाद्या विमा कंपनीला एका वर्षात एकूण 100 रुपये प्रीमियम मिळतो   

नक्की वाचा:चढ्या दराने बियाणे आणि खतांची विक्री केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार- कृषीमंत्री दादाजी भुसे

English Summary: premium to this central government scheme of pmjjby and pmsby
Published on: 03 June 2022, 08:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)