Others News

आपण जीवनातील बऱ्याचशा गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून किंवा तत्सम वित्तीय संस्थांकडून कर्ज घेत असतो व अशा घेतलेल्या कर्जाची परतफेड आपण ईएमआयच्या माध्यमातून करत असतो. या ईएमआय च्या माध्यमातून आपण घेतलेली मुद्दल आणि मुद्दलावर व्याज अशा स्वरूपात ते परतफेड होत असते.

Updated on 23 July, 2022 3:10 PM IST

आपण जीवनातील बऱ्याचशा गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून किंवा तत्सम वित्तीय संस्थांकडून कर्ज घेत असतो व अशा घेतलेल्या कर्जाची परतफेड आपण ईएमआयच्या माध्यमातून करत असतो. या ईएमआय च्या माध्यमातून आपण घेतलेली मुद्दल आणि मुद्दलावर व्याज अशा स्वरूपात ते परतफेड होत असते.

आता कर्ज घेणाऱ्यांपैकी घर बांधण्यासाठी बरेच जण गृहकर्ज घेतात.एखाद्या बँकेकडून गृहकर्ज मंजूर करून त्या माध्यमातून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. आपण घेतलेल्या गृहकर्जाच्या मुद्दलावर व्याज लागते. या व्याजात जाणाऱ्या रकमेचा काही हिस्सा आपण प्री पेमेंट करून वाचवू शकतो.

नक्की वाचा:धक्कादायक ! 'या' योजनेच्या 9 हजार मृत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा

 प्री पेमेंट केल्याने मिळतो फायदा

या क्षेत्रातील तज्ञांच्या मते,प्री पेमेंटच्या माध्यमातून आपण व्याजा मध्ये जाणारी खूप मोठी रक्कम वाचवू शकतो. प्री पेमेंट केल्याने व्याजावर जाणारे भरपूर पैसे वाचवले जाऊ शकतात.परंतु तुमचे कर्ज देखील लवकर फिटण्यास मदत होते. जर आपण याचे फायदे समजून घेण्यासाठी काही आकडेवारी बघू.

जर तुम्ही  लोन साठी पूर्णवेळ नियमितपणे ईएमआय भरले तर तुमच्या कडून जवळजवळ 23 लाख 16 हजार रुपये बँकेला जातात. विशेष म्हणजे यातील अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे तेरा लाखापर्यंत रक्कम केवळ व्याजात जाते.

नक्की वाचा:मत्स्यपालनातून साधा प्रगती!सरकारच्या 'या' योजनेतून मिळवा 60 टक्के सबसिडी अन सुरु करा मत्स्यपालन

प्री पेमेंट केल्याचा फायदा कसा होईल?

 जर तुमचा ईएमआय 9650 रुपयांचा असेल तर या ईएमआय बरोबर तुम्ही दोन हजार रुपये दर महिन्याला नियमितपणे प्री पेमेंट केले 20 वर्षाचे तुमचे कर्ज जवळजवळ बारा वर्ष आठ महिन्यात संपेल.

म्हणजे त्यातून तुमच्या जवळ जवळ 88 महिन्यांचे पैसे वाचतील.जर तुम्ही दहा लाख लोन घेतले असेल तर तब्बलपाच लाख 52 हजार रुपये व्याज वाचेल.एवढेच नाही तर तुम्ही प्रति महिना ईएमआय आधीच भरलेला असल्यामुळे

प्रीपेमेंटची सर्व रक्कम ही तुमच्या मुद्दलात जमा होत असते व त्यामुळे मुद्दल दर महिन्याला घटत असते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने दर महिन्याला तुम्हाला कमी मुद्दलावर व्याज लागते व तुमचे लाखो रुपये वाचतात व कर्ज देखील मुदती आधीच संपते.

नक्की वाचा:मोठी बातमी! 5 वर्षात विमा कंपन्यांनी तब्बल 40,000 कोटींची केली कमाई

English Summary: pre payment tips use in repay of you taking loan can save 50 percent cash
Published on: 23 July 2022, 03:10 IST