आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. सन 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे.
या योजनेमध्ये झोपडपट्टी किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत जे लोक घर, फ्लॅट खरेदी करतात त्यांनाही सरकार कडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. तसेच या योजनेसंबंधी असलेली काही तक्रार असेल तर तुम्हाला ती नोंदवता येते.
घरकुल योजना संबंधी कुठली तक्रार असेल तर ती कुठे नोंदवावी?
या योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार ग्रामपंचायत, तालुका,जिल्हा आणि राज्य स्तरावर तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तक्रार निवारण प्रणाली ची तरतूद आहे.या योजनेसंबंधी काही तक्रार प्राप्त झाल्यापासून 45 दिवसांच्या आत प्रत्येक स्तरावर तक्रारींचा निपटारा करण्याची यामध्ये तरतूद आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी तुम्ही ब्लॉक विकास अधिकारी शिकवा अस्थानी गृहनिर्माण सहाय्यक यांच्याशी संपर्क साधू शकता.
पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुल साठी अर्ज कसा करावा?
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने https://pmaymis.gov.in/हे मोबाईल आधारित गृहनिर्माण अँप तयार केले आहे.
- हे ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
- आता तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर च्या आधाराने लोगिन आयडी तयार करावा लागेल.
- त्यानंतर या ॲप द्वारे तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
- या ओटीपी च्या साह्याने लोगिन केल्यानंतर मागितलेली आवश्यक माहिती भरावी लागेल.
- या योजनेअंतर्गत घर मिळण्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर केंद्र सरकार लाभार्थ्यांची निवड करते.
- यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी PMAYG या संकेत स्थळावर टाकलीजाते.(संदर्भ- महा अपडेट )
Published on: 18 September 2021, 08:51 IST