आपण सगळेजण विमा का काढतो त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटापासून आर्थिक संरक्षण व्हावे किंवा आर्थिक आधार मिळावा यासाठी काढतो. सध्या बाजारात विविध प्रकारच्या एलआयसीच्या किंवा इतर कुठल्याही विमा कंपन्यांचे पॉलिसी प्लान उपलब्ध आहेत. परंतु काही विमा प्लॅनचे प्रीमियम ते अत्यंत मोठ्या रकमेच्या असतात.
नवीन सर्वसामान्य लोकांना जास्त प्रीमियम भरणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी किंवा त्यांना विमा कवच मिळावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. या विमा योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, वर्षाला फक्त बारा रुपयाचा प्रीमियम देऊन तुम्ही दोन लाखांपर्यंत चा विमाचा लाभ घेऊ शकता. इतर विमा योजनेच्या तुलनेने ही अपघात विमा योजना अत्यंत स्वस्त आणि किफायतशीर आहे.दुर्बल घटकातील लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचे आयुष्य सुरक्षित करण्याबरोबरच त्यांना संकटसमयी मदत मिळावी यासाठी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे मिळणारे विमा कवच
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जर एखाद्या अपघातात विमाधारकाच्या मृत्यू झाला, तर त्याचे कुटुंब किंवा नॉमिनेट व्यक्तीला दोन लाख रुपये मिळतात. तसेच अपघातावेळी ती व्यक्ती अर्धवट अपंग असेल तर त्याला एक लाख रुपये दिले जातात तसेच पूर्णपणे अपंगत्व आले तर दोन लाख रुपये पूर्ण दिले जातात.
ही पॉलिसी कोण घेऊ शकते
ही पॉलिसी घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 70 वर्ष वयोगटात असावे.या पॉलिसीमध्ये विमाधारकाच्या बँक खात्यातून दरवर्षी बारा रुपयांची प्रीमियम ऑटोमॅटिक वजा केले जातात. जर आपल्याला ही पॉलिसी बंद करायचे असेल तर आपले ज्या बँकेत खाते आहे तिथे जाऊन अर्ज देऊन आपण ती बंद करू शकतो.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज कसा करावा
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँकेत सक्रिय बचत खाते असणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते आणिआधार कार्ड एकमेकांना लिंक करणे बंधनकारक आहे. अर्जाचा फॉर्म भरून तसेच आधार कार्ड, बँक पासबुक, वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला यांच्या छायाप्रती बनवून पासपोर्ट आकाराचा फोटो ठेवा. अधिक माहितीसाठी आपण
https://jansuraksha.gov.in/Forms-PMSBY. Aspx या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Published on: 06 May 2021, 06:17 IST