Others News

Post Office SIP : पोस्ट ऑफिसने (Indian Post Office) एक SIP योजना आणली आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये उपलब्ध होणार आहेत. यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता.

Updated on 10 September, 2022 8:51 AM IST

Post Office SIP : पोस्ट ऑफिसने (Indian Post Office) एक SIP योजना आणली आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये उपलब्ध होणार आहेत. यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता.

यामध्ये, काही काळानंतर, गुंतवणूकदारांना मासिक उत्पन्न (Monthly Income) योजनेची (POMIS) संधी मिळते. या योजनेत, तुम्ही एकरकमी रक्कम गुंतवून (Investment) दरमहा तुम्ही ठराविक रक्कम मिळवू शकता.

5 वर्षांनी पूर्ण पैसे परत मिळतील 

या योजनेत तुम्ही जे काही पैसे जमा केले आहेत ते तुम्हाला 5 वर्षांनंतर परत मिळतात. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत एकल आणि संयुक्त खाती उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी अनेकजण या योजनेचा लाभ घेत आहेत.

संयुक्त खाते

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) मध्ये एका खात्याद्वारे जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकतात.  तुम्ही संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. 3 प्रौढ देखील संयुक्त खात्यात सामील होऊ शकतात.  परंतु गुंतवणुकीची कमाल मर्यादा 9 लाख रुपये एवढीच आहे.

दरमहा पेन्शन मिळेल

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर सध्या वार्षिक 6.6% व्याजदर मिळत आहे. जर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपये जमा केले असतील तर वार्षिक 6.6 टक्के दराने 1 वर्षासाठी एकूण 59,400 रुपये व्याज मिळेल. ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत वितरित केली जाईल. अशा प्रकारे, प्रत्येक महिन्याचे व्याज सुमारे 4950 रुपये असेल. तुम्ही एकाच खात्यातून 4,50,000 लाख रुपये जमा केल्यास, मासिक व्याज 2475 रुपये असेल.

असा फायदा घेता येणार 

यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागेल. दस्तऐवजातील ओळखपत्रासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे. यासोबतच 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल पत्त्याच्या पुराव्यासाठी वैध आहे.

यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन POMIS फॉर्म भरू शकता. तुम्ही ते ऑनलाइनही डाउनलोड करू शकता. फॉर्म भरताना नॉमिनीचे नाव द्यावे लागेल. हे खाते उघडण्यासाठी सुरुवातीला 1000 रुपये रोख किंवा चेकद्वारे जमा करावे लागतील.

English Summary: post office sip 5 thousand per month you will get in 'this' plan of Post, understand the plan
Published on: 10 September 2022, 08:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)