Others News

Post Office Scheme : मित्रांनो जर तुम्हाला देखील गुंतवणूक (Investment Tips) करायची असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो खरे पाहता देशातील गुंतवणूकदार सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक (Investment) करण्यास अधिक पसंती दर्शवीत आहेत. अशातच देशातील सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक योजना फक्त पोस्ट ऑफिस विभागाने (Indian Post Office) आणली आहे.

Updated on 09 September, 2022 8:42 AM IST

Post Office Scheme : मित्रांनो जर तुम्हाला देखील गुंतवणूक (Investment Tips) करायची असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो खरे पाहता देशातील गुंतवणूकदार सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक (Investment) करण्यास अधिक पसंती दर्शवीत आहेत. अशातच देशातील सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक योजना फक्त पोस्ट ऑफिस विभागाने (Indian Post Office) आणली आहे.

आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या कष्टाचे पैसे सरकारी योजनांमध्ये गुंतवायचे असतात. किंबहुना, तो हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानतो. या बातमीत आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या (Post Office News) अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि तुम्हाला मॅच्युरिटीवर दुप्पट पैसे मिळतील.

आधी योजना काय आहे ते समजून घ्या 

मित्रांनो आम्ही ज्या योजने बद्दल बोलत आहोत ती योजना आहे पोस्ट ऑफिस (Post Office Near Me) किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) योजना. तुम्ही किसान विकास पत्र योजनेत 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही.

त्याची परिपक्वता कालावधी 124 महिने (10 वर्षे 4 महिने) आहे. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून तो बराच काळ गुंतवणूक करू शकेल. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. या योजनेचा लॉक-इन कालावधी 2.5 वर्षांचा आहे.

124 महिन्यांपर्यंत गुंतवणूक करा पैसे डबल होणार 

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्हाला तुमची गुंतवणूक 124 महिने टिकवून ठेवावी लागेल. येथे व्याजदर दर तिमाहीत निश्चित केले जातात. या योजनेवर सरकार 6.9 टक्के दराने व्याज देत आहे. जूनमध्ये त्याच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. रेपो दरात झालेली वाढ पाहता आता त्याचा व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.

5 लाखाचे बनतील 10 लाख होतील

पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त, तुम्ही ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून देखील खरेदी करू शकता. येथे तुम्हाला गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते. मॅच्युरिटीवर तुमचे पैसे दुप्पट होतात. जर तुम्ही यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर 124 महिन्यांनंतर ही रक्कम दुप्पट होऊन 10 लाख रुपये होईल.

English Summary: post office scheme kisan vikas patra yojana
Published on: 09 September 2022, 08:42 IST