Others News

Post Office Scheme: मित्रांनो तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल आणि सुरक्षित परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. पोस्ट ऑफिस एमआयएस ही पोस्टाची अशीच एक बचत योजना आहे. ज्यामध्ये फक्त एकदा गुंतवणूक केल्यास तुम्हाला निश्चित परतावा मिळणार आहे. या पोस्टाच्या सरकारी योजनेत एकदा गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात चांगला पैसा कमवू शकता. पोस्टाच्या या योजनेचे अनेक फायदे आहेत.

Updated on 04 July, 2022 3:51 PM IST

पोस्टाची या भन्नाट योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने देखील गुंतवणूक केली जाऊ शकते. या साठी या योजनेत खाते उघडावे लागते.  जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने हे खाते उघडले तर तुम्हाला त्याच्या शाळेच्या फीची चिंता करावी लागणार नाही. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पोस्टाच्या या सरकारी योजनेविषयी सविस्तर.

किती गुंतवणूक करू शकता

पोस्टाच्या या योजनेचे हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. या अंतर्गत किमान एक हजार किंवा 4.5 लाख रुपये जमा करता येतील. या योजनेअंतर्गत 6.6% व्याजदर गुंतवणूकदाराला दिला जातो.

5 वर्षांपर्यंत परिपक्वता

जर तुमच्या मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्याच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते. जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर पालक हे खाते उघडू शकतात.  या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे.

त्यानंतर ते बंद केले जाऊ शकते. जर मूल 10 वर्षांचे असेल अन तुम्ही दोन लाख रुपये त्याच्या नावावर गुंतवले तर दर महिन्याला 6.6 व्याजदराने 1100 रुपये मिळतील. पाच वर्षांत हे व्याज एकूण 66 हजार रुपये होईल.

शेवटी, 2 लाख रुपये देखील परत केले जातील. जर तुम्ही 4.5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा सुमारे 2500 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही जर साडेचार लाख रुपये या योजनेत गुंतवले तर तुम्हाला वार्षिक rs.30000 व्याजाच्या स्वरूपात मिळणार आहेत. या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकल किंवा संयुक्तपणे उघडता येते.

English Summary: post office scheme invest one time earn 30000 annual
Published on: 04 July 2022, 03:51 IST