Others News

भारतात अनेक लोक गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात. अनेक लोक म्युच्युअल फंड (Mutual funds) सारख्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक (Investment) करतात मात्र अशा ठिकाणी गुंतवणूक ही रिस्कने भरलेली असते. म्हणून अनेक लोक या प्रकारच्या गुंतवणुकीत विश्वास ठेवत नाही. म्हणून आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका योजने विषयी जाणून घेणार आहोत या योजनेत अगदी छोटीशी रक्कम गुंतवणूक करून चांगली मोठी रक्कम प्राप्त केली जाऊ शकते.

Updated on 09 January, 2022 7:19 PM IST

भारतात अनेक लोक गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात. अनेक लोक म्युच्युअल फंड (Mutual funds) सारख्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक (Investment) करतात मात्र अशा ठिकाणी गुंतवणूक ही रिस्कने भरलेली असते. म्हणून अनेक लोक या प्रकारच्या गुंतवणुकीत विश्वास ठेवत नाही. म्हणून आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका योजने विषयी जाणून घेणार आहोत या योजनेत अगदी छोटीशी रक्कम गुंतवणूक करून चांगली मोठी रक्कम प्राप्त केली जाऊ शकते.

जर आपणास सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर आपण पोस्ट ऑफिसच्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये (In Post Office Recurring Deposit) गुंतवणूक करू शकता.  ही पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या या बचत योजना याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.

100 रुपया पासून गुंतवणूकिला सुरवात

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम (Post Office Recurring Deposit Scheme) मध्ये आपण शंभर रुपये देखील गुंतवणूक करू शकता. या स्कीममध्ये आपण अनलिमिटेड रक्कम गुंतवणूक (Unlimited amount investment) करू शकता. यासाठी काही सीमा ठेवण्यात आलेली नाही.आपण आपल्या बजेटनुसार या योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या स्कीम अंतर्गत पाच वर्षासाठी अकाउंट ओपन केले जाते. या स्कीममध्ये गुंतवणुकीवर वार्षिक व्याज (Annual interest on the investment) मिळत असते. असे असले तरी तीन महिन्यात व्याजाची रक्कम खात्यात जमा केली जाते.

कसे मिळतील 16 लाख रुपये (How to get Rs 16 lakh)

जर आपणास पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आपणास गुंतवणूक केलेल्या रकमेवर 5.8 टक्के व्याजदर (5.8 percent interest rate) प्राप्त होईल. या योजनेसाठी चे नवीन व्याज तर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिसची ही योजना गुंतवणूक करण्यासाठी खुपच फायदेशीर आहे. मित्रांनो जर आपणास ही गुंतवणूक करायची असेल तर आपण पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग स्कीम मध्ये गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवू शकता. जर आपण या योजनेत महिन्याला दहा हजार रुपये दहा वर्षासाठी गुंतवले आपणास या स्कीम मधून दहा वर्षानंतर सोळा लाख रुपये मिळतील.

English Summary: post office recurring scheme
Published on: 09 January 2022, 07:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)