वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियम आणि लागणारे कागदपत्र हे आवश्यक असतात. वाहन चालवताना किंवा वाहनांसंबंधी वेगवेगळे नियम आहेत. जरासे नियम मोडले तर दंडात्मक कारवाई केली जाते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
त्यामुळे प्रत्येक नियम आपल्याला माहित असणे देखील तेवढेच गरजेचे असते. कार किंवा स्कूटर, मोटरसायकल चालकाकडे पोलुशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट अर्थात पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर संबंधित वाहनधारकावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
ज्याच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल त्यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो. या प्रमाणपत्राच्या बाबतीत एक कायदा देखील असून
त्या कायद्याचा विचार केला तर केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 अनुसार प्रत्येक मोटार वाहन जे बीएस एक, बिएस2, बिएस 3 आणि बिएस 4 इंजन वर चालते त्या प्रत्येक वाहनधारकाकडे हे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
मिळालेल्या माहितीचा विचार केला तर, तुमच्याकडे व्हॅलिड पियुसी सर्टिफिकेट नसेल तर चालकास सहा महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवास किंवा दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो किंवा या दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात. एवढेच नाही तर चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द देखील केली जाऊ शकते.
नक्की वाचा:भारीच! आता तुमची Activa इलेक्ट्रिक करा, एका वेळेस १०० किमी चालणार...
या ठिकाणी मिळते पीयूसी सर्टिफिकेट
1- पियुसी सर्टिफिकेट तयार करण्याची प्रक्रिया खूप सोपी असून त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर गाडी घेऊन तेथील पेट्रोल पंपावरील प्रदूषण तपासणी केंद्रात अर्थात पीयूसी सेंटर वर जावे लागेल.
2- केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी जे कर्मचारी असतील ते गाडीची तपासणी करतात व त्यानंतर तुम्हाला पियुसी सर्टिफिकेट देतात. यासाठी अवघा 50 ते 100 रुपयांचा खर्च येतो आणि जास्त वेळ देखील खर्च होत नाही.
Published on: 17 July 2022, 03:19 IST