Mobile News:- भारतामध्ये स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या असून प्रत्येक कंपनीचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे स्मार्टफोन बाजारामध्ये मिळतात. परंतु ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला तर प्रत्येकाची कमीत कमी किमतीत चांगले फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असतात.
त्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून जर तुमचा नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार असेल तर तुम्ही चिनी टेक कंपनी पोकोने भारतामध्ये पाच ऑगस्टला लॉन्च केलेला स्मार्टफोन घेऊ शकतात. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे हा परवडणाऱ्या किमतींमध्ये तुम्हाला मिळणार आहे व त्यामध्ये अनेक प्रकारचे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
पोकोने केला M6 प्रो 5G स्मार्टफोन लॉन्च
पाच ऑगस्टला पोको या स्मार्टफोन कंपनीने पोको M6 प्रो 5G स्मार्टफोन लॉन्च केला असून हा फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. हा फोन बजेट सेगमेंट मध्ये असून यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 5G प्रोसेसर देण्यात आला असून या सोबतच 90Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.79 इंचाचा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला असून यामध्ये तुम्हाला ब्लॅक आणि फॉरेस्ट ग्रीन हे पर्याय मिळणार आहेत. उत्तम कामगिरी करिता या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर 4NM वर तयार करण्यात आला असून हा फोन अँड्रॉइड तेरा आधारित एमआययुआय 14 वर काम करतो.
तसेच कॅमेरा बद्दल विचार केला तर फोटोग्राफीसाठी यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा आणि दोन मेगापिक्सलचा खोलीचा कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. उत्तम सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करीता यामध्ये आठ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.
तसेच फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसंच कनेक्टिव्हिटी साठी साईड माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर, साडेतीन मीमी हेडफोन जॅक, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आणि आयआर ब्लास्टर देण्यात आला आहे.
किती आहे या स्मार्टफोनची किंमत?
पोकोने हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला असून यातील पहिला प्रकार म्हणजे चार जीबी रॅम+ 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 10 हजार 999 तर सहा जीबी रॅम+ 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 12999 इतकी आहे. हा स्मार्टफोन 9 ऑगस्ट पासून सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
Published on: 08 August 2023, 08:53 IST