Others News

पीक कापणीच्या १४ दिवसानंतर जर अवकाळी पाऊस झाला असेल. या अवकाळी पावसात पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला ७२ तासात पीक विमा कंपनीला याची माहिती द्यावी लागेल.

Updated on 05 May, 2020 5:51 PM IST


पीक कापणीच्या १४ दिवसानंतर जर अवकाळी पाऊस आणि गारपीट झाला असेल. या अवकाळी पावसात पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला ७२ तासात पीक विमा कंपनीला याची माहिती द्यावी लागेल.  त्यानंतरच पीक नुकसान भरपाई मिळणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने याविषयीचा सुचना शेतकऱ्यांना दिली आहे. जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याला पीक विमा कंपन्यांच्या अटी माहित नसतील तर त्याचे आर्थिक नुकसान होऊ नये.

 बऱ्याच वेळा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास खाली पडत असतो. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत असते. शेतकऱ्याचे अधिक आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवत आहे. या योजनेतून तुम्ही पीक नुकसानीचा मोबदला मिळवू शकता. परंतु अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नसते. यामुळे पीक विमा नुकसानीचा क्लेम करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

बँकेत जाऊनही तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज करु शकता. यासाठी तुम्ही ऑनलाईनही अर्ज करु शकता. https://pmfby.gov.in/  लिंकवर जाऊन आपण या योजनेचा अर्ज करु शकता. 

यासाठी लागणारी कागदपत्रे - फोटोग्राफ, ओळखपत्र - आधार कार्ड, वाहन चालक परवाना, मतदान कार्ड, पासपोर्ट,  यासह सात बारा उतारा, तलाठीकडील शेती असल्याचा दाखलाही लागेल.

English Summary: PMFBY: farmer's should give information in 72 hours to take crop To compensate
Published on: 05 May 2020, 04:46 IST