Others News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या सत्रातील पहिली मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत (एमएसएमई)सुक्ष्म, लघु, आणि मध्यम क्षेत्रातील तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या लोकांविषयी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने दुकानदार आणि छोटे उद्योग धंदे करणाऱ्या लोकांचं आय़ुष्य बदलणार आहे.

Updated on 03 June, 2020 12:28 PM IST


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या सत्रातील पहिली मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी  पार पडली.  या बैठकीत (एमएसएमई)सुक्ष्म, लघु, आणि मध्यम क्षेत्रातील तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या लोकांविषयी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने दुकानदार आणि छोटे उद्योग धंदे करणाऱ्या लोकांचं आय़ुष्य बदलणार आहे. यावेळी सरकारने स्वनिधी योजनेची सुरुवात केली आहे. ठेला, फेरीवाले, आणि छोटे दुकानदारांना सरकार कर्ज देणार आहे. या कर्जाच्या मदतीने हे व्यवसायिक आपले कामकाज परत चालू करू शकतील. या योजनेतून व्यवसायिकांना १० हजार रुपयांचे कर्ज भेटणार आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्यण घेण्यात आला. या योजनेसाठी सरकारने ५ हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. दरम्यान कर्ज घेण्यासाठी तारण देण्याची किंवा कोणतीच गांरटी देण्याची गरज नसणार आहे.

कसे भेटेल कर्ज -

रस्त्याच्या बाजूला दुकान लावणारे, ठेला लावणाऱ्या लोकांना या योजनेतून कर्ज मिळणार आहे. फळे- भाजीपाला, लॉण्ड्री, केसकर्तनालये, पान दुकानांचा यात समावेश करण्यात आला आहे. फारच सोप्या अटींवर हे कर्ज दिले जाणार आहे. यासाठी कोणतीच गांरटी देण्याची गरज नाही.

५० लाख लोकांना होणार फायदा

रस्त्यावर दुकाने लावणाऱ्यांसाठी ही फार महत्त्वाची योजना असून याचा फायदा घेत दुकानदार आपला व्यवसाय परत सुरू करू शकतील. या योजनेसाठी सरकारने ५ हजार रुपयांची तरतूद केली असून यातून ५० लाख दुकानदारांना, ठेले लावणाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचा आशा वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ७ टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे,   या कर्जासाठी गारंटीची गरज नाही. मोबाईल ऐप आणि वेब पोर्टलवरून आपण यासाठी अर्ज करु शकता. वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास व्याजावर ७ टक्क्यांचे अनुदान मिळणार आहे.

English Summary: PM Swanidhi Scheme : Hawkers and shopkeeper will get loan on without any Guarantee, read article to know central's scheme
Published on: 03 June 2020, 12:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)