Others News

नागरिकांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. नागरिकांना योजनेचा लाभ सुलभरित्या घेता यावा आणि प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभार्थी व्हावा, यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असते.

Updated on 14 August, 2020 7:47 PM IST


नागरिकांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. नागरिकांना योजनेचा लाभ सुलभरित्या घेता यावा आणि प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभार्थी व्हावा, यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असते.  व्यावसियाकांसाठी ही सरकारने एक पीएम स्वनिधि योजना आणली असून रस्त्यावरील दुकानदार या योजनेचा लाभ घेत आहेत.  विशेष म्हणजे ही खूप लोकप्रिय होत असून लाखो दुकानदारांनी या योजनेच्या अंतर्गत कर्जासाठी अर्ज केले आहेत.

दरम्यान ही योजना अधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मोबाईल एप तयार करण्यात आले आहे. या एपच्या मदतीने आपण घरी बसून कर्जासाठी अर्ज करू  शकतात.  पीएम स्वनिधि योजनेतून स्ट्रीट वेंडर्सला १० हजार रुपयांचे कर्ज त्वरीत मिळते.  दरम्यान ही योजनेचे एप आल्याने योजनेचा लाभार्थींची संख्ंया वाढण्यास मदत होईल.  पीएम स्वनिधि योजनेतून दुकानदार, फळे, भाजी विक्रेते, सलून व्यावसायिक दुकानदार कर्ज घेऊ शकतात.

काय आहेत पीएम स्वनिधि योजनेच्या मोबाईल एपचे फिचर्स

(Features of PM Svanidhi Mobile App)

या एपचे खूप फिचर्स असून हे हाताळण्यास सोपे आहेत.  यात अर्जदरांची केवायसी,  अर्ज प्रक्रिया, आणि रिअल टाईम मॉनेटरिंगची सुविधा मिळते. दरम्यान या योजनेच्या मार्फत ५०लाख स्ट्रीट वेंडर्सला लाभ देण्याचे उद्धिष्ट आहे.  या योजनेतून कर्ज घेतल्यास आणि हे कर्ज वेळवर फेडल्यास आपल्याला ७ टक्क्यांची सूट मिळते.

English Summary: PM Svanidhi Mobile App: Get a loan through mobile app
Published on: 14 August 2020, 07:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)