Others News

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून व्यक्तिला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर वृद्धापकाळ मध्ये कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये, या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आली आहे

Updated on 03 December, 2021 11:06 AM IST

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून व्यक्तिला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर वृद्धापकाळ मध्ये कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये, या दृष्टिकोनातून हीयोजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून भारत सरकार पेन्शनचे सुविधा प्रदान करते. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना मध्ये अवघे दोन रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून व्यक्ती वर्षाला छत्तीस हजार रुपये मिळवूशकतात. या लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

 या योजनेसाठी असलेले पात्रतेचे निकष

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रातील लोक खाते उघडू शकतात किंवा ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. असे लोक यासाठी पात्र आहेत. या योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदाराचे वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.जर तुम्हाला या योजनेसाठी नाव नोंदणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि बचत खाते याविषयी माहिती द्यावी लागेल.

त्या योजनेसाठी द्यावा लागणारा प्रीमियम-

 पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना मध्ये प्रीमियमची रक्कम ही वयाच्या हिशोबाने वेगवेगळ्या पद्धतीने आहे. मध्ये तुम्ही वयापरत्वे 55 रुपये ते दोनशे रुपये महिन्याला प्रीमियम  भरू शकतात. समजा तुम्ही या योजनेमध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी सहभाग घेतला तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला शंभर रुपये प्रीमियम द्यावा लागेल आणि चाळीस वर्षे वय असणाऱ्यांना दोनशे रुपये योगदान द्यावे लागते. जर तुम्ही अठराव्या वर्षी योजनेत सहभागी झालात तर तुम्हाला महिन्याला पंचावन्न रुपये योगदान द्यावे लागते.

 या योजनेसाठी अर्ज कसा कराल?

  • पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://maandhan.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर होम पेज वर Hear to apply now या लिंक वर क्लिक करावे.
  • त्यानंतर selfenrollement वर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे.
  • तुमचे नाव, ईमेल आयडी इत्यादी माहिती नोंदवावी.
  • नंतर  कॅपच्या कोड टाइप करावा आणि मोबाईल वर आलेला ओटीपी सबमिट करावा.
  • त्यानंतर लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि फॉर्म जमा केल्यानंतर प्रिंटाऊट काढावी.
English Summary: pm shramyogi maandhan yojana is benificial for elderly person
Published on: 03 December 2021, 10:48 IST