Others News

7th pay commission: केंद्र सरकारमध्ये काम करणारे लाखो केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी करत आहेत. अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याशी संबंधित एक महत्त्वाची बातमी आहे. सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते.

Updated on 03 August, 2022 12:05 PM IST

7th pay commission: केंद्र सरकारमध्ये (Central government) काम करणारे लाखो केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून महागाई भत्त्यात वाढ (DA) करण्याची मागणी करत आहेत. अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याशी संबंधित एक महत्त्वाची बातमी आहे. सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते.

आज शिक्कामोर्तब होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी मिळू शकते. केंद्र सरकार किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करते.

हे ही वाचा: August Bank Holidays 2022: ऑगस्टमध्ये 18 दिवस बँका बंद राहतील; पहा संपूर्ण यादी...

DA किती वाढेल

3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीएमध्ये 5 ते 6 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सरकार घेईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीएचा लाभ मिळू शकतो.

याआधी सरकार महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ करेल अशी अपेक्षा होती. पण अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही वाढ ५ टक्क्यांऐवजी ६ टक्क्यांपर्यंत असू शकते.

हे ही वाचा: 7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA इतक्या टक्क्यांनी वाढणार, जाणून घ्या पगारात किती वाढ होणार?

आता तुम्हाला किती DA मिळतो

सध्या केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून ३४ टक्के महागाई भत्त्याचा लाभ दिला जातो. 2021 पासून सरकारने डीएमध्ये 11 टक्के वाढ केली आहे. यावर्षी मार्च २०२२ मध्ये सरकारने डीए ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.

आता पुन्हा एकदा महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढवला तर तो ३९ टक्के होईल. याचा थेट परिणाम ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांवर होणार आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरात दिलासा! जाणून घ्या तुमच्या शहरातले ताजे दर...

English Summary: PM Modi will announce DA increase today
Published on: 03 August 2022, 12:05 IST