Others News

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचे 3 हफ्ते म्हणजेच एकूण 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देत असते. या योजनेअंतर्गत 8 हफ्ते म्हणजेच 16000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांचा 9 वा हफ्ता येणे बाकी आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी आणि सुरक्षित वृद्धपकाळासाठी सरकारने पेंशन सुविधा पीएम शेतकरी मानधन योजना सुरू केली आहे.

Updated on 26 August, 2021 9:44 PM IST

शेतकऱ्यांना मिळणार गॅंरेटीड पेंशन

पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर पेंशन दिली जाणार आहे. जर तुम्ही पीएम किसानमध्ये खातेधारक असाल तर कोणतीही कागदपत्रांची कारवाई करण्याची गरज नाही. तुमचे थेट रजिस्ट्रेशन पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेतसुद्धा होईल. या योजनेच्या अनेक सुविधा आणि फायदे आहेत.

पंतप्रधान शेतकरी मानधन योजना काय आहे

पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या 60 वर्षे नंतर पेंशनची सुविधा आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांचे म्हातारपण सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षापर्यंतचा कोणीही शेतकरी गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 हजार रुपयांपर्यंत मासिक पेंशन मिळते.

मानधन योजनेसाठी गरजेचे कागदपत्र

1 आधार कार्ड
2 ओळख पत्र
3 वयाचा दाखला/जन्माचा दाखला
4 उत्पन्नाचा दाखला
5 शेतजमीनीची माहिती
6 बँक खाते पासबुक
7 मोबाईल नंबर
8 पासपोर्ट साइज फोटो

लाभार्थींना फायदा

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 2 हजार रुपयांचे 3 हफ्ते म्हणजेच 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाते. शेतकऱ्यांनी पीएम किसान मानधन योजनेत भाग घेतला तर त्यांची नोंदणी सहज होऊ शकते. मानधन योजनेसाठी दरमहिना कापली जाणारी रक्कम शेतकरी सन्मान निधीच्या तीन हफ्त्यांच्या रक्कमेतून कापली जाईल. म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या खिशातून पैसे द्यावे लागणार नाही.

प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: PM Kisan will now get a monthly pension of Rs 3,000 along with Rs 6,000 per annum; Learn in detail
Published on: 26 August 2021, 09:44 IST