Others News

देशातील बळीराजाचं जीवन म्हणजे तारेवरच्या कसरती प्रमाणेच असते. कधी अवकाळी पावसाचा मार, तर कधी दुष्काळाचा घात होत असतो. आता कोरोना व्हायरसमुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. दरम्यान अशाच संकटात सापडलेल्या बळीराजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात केली होती.

Updated on 28 March, 2020 2:26 PM IST


देशातील बळीराजाचं जीवन म्हणजे तारेवरच्या कसरती प्रमाणेच असते. कधी अवकाळी पावसाचा मार, तर कधी दुष्काळाचा घात होत असतो. आता कोरोना व्हायरसमुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.  अशाच संकटात सापडलेल्या बळीराजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात केली होती.  या योजनेची सुरुवात फेब्रुवारी २०१९ पासून करण्यात असून या योजनेतर्गत शेतकऱ्यांना ६ हजार रुपयाचे आर्थिक साहाय्य मिळते.  केंद्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांच्या पंसतीस उतरली असून लोकप्रिय योजनेत पीएम - किसान योजनेचा समावेश झाला आहे.  या योजनेत नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू आहे.  ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नोंदणी करु शकता.  काय आहे ही योजना नोंदणी कशी करावी याविषयी आपण अधिक जाणून घेऊ

काय आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून त्यांना या योजनेतून आर्थिक साहाय्य दिले जाते.  साधारण १४ कोटी शेतकऱ्यांना या योजनेतून निधी दिला जात आहे.  शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे.  यातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाते.  

कशाप्रकारे मिळणार योजनेचा पैसा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ६ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जाते. प्रत्येक टप्प्यात २ हजार रुपये दिले जात असून हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.  पैसे आपल्या खात्यात आल्याची माहिती मोबाईलवर मेसेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाते.
कसा करणार योजनेसाठी अर्ज - योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम - योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

पीएम - किसान योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात 

  • आधार कार्ड
  • बँक खाते
  • सातबारा उतारा
  • रहिवाशी प्रमाणपत्र

आपली नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची, देयक आणि इतर तपशीलाचा माहिती वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे.

घरी बसून जाणू घ्या लाभार्थ्यांची स्थिती
कोणत्याही राज्यातील शेतकऱी आपल्या घरी बसून पीएम किसान योजनेची माहिती आणि लाभार्थ्यांची स्थिती जाणून घेऊ शकता.  यासाठी खालील पद्धतीने कृती करावी.  सर्वात आधी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जावे.  यावर क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल.  होम पेजवर Farmer Corner हा पर्याय दिसेल.  यात आपल्याला लाभार्थी स्थिती या पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. यात आपल्याला लाभार्थ्यांची स्थिती ची माहिती मिळेल. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. जर तुम्हाला लाभार्थ्यांची स्थिती पाहायची आहे. तर आपला आधार नंबर, मोबाईल नंबर, आणि बँक खाते क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांची माहिती मिळेल.

स्व:ताची नोंदणी आणि सीएससी शेतकऱ्यांची स्थितीची माहिती
आधी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ यावर जावे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल. या होम पेजवर Farmers Corner हा पर्याय दिसेल यात Status of Self Registered/CSC Farmers स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.  या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅच्चा कोड यादी गोष्टी भराव्यात.  सर्व माहिती भरल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेची सद्य स्थितीची माहिती मिळेल.

मोबाईल अॅपच्या मदतीने कसे तपासा सन्मान निधी योजनेची यादी

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य केले जाते. याची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी केंद्र सरकारने मोबाईल अॅप सुरू केले आहे. या मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्ही पीएम - किसान योजनेची माहिती मिळवू शकता. 

पीएम- किसान मोबाईल अॅप कसे डाऊनलोड करणार

 आपल्या Android मोबाईलच्या प्ले स्टोर वर जावे. तेथे सर्च टॅबवर PMKISAN GoI Application ला डाऊनलोड करावे. डाऊनलोड केल्यानंतर अॅप्लीकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर एक होम पेज दिसेल. या होम पेजवर आपल्याला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व सेवा दिसतील. Check Beneficiary Status , Edit Aadhaar Details , Self Registered Farmer Status , New Farmer registration , About the schem , PM -Kisan Helpline आदि.

पीएम किसान योजनेचा लाभ कोणाला नाही मिळणार 

ही योजनेचा लाभ सर्वच शेतकरी घेऊ शकत नाहीत. लाभार्थ्याच्या घरातील सदस्य सरकारी नोकरदार नसावा. आजी-माजी मंत्री विधानसभा- विधानपरिषदेचा सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. यासह महापौर, जिल्हा पंचायतचे सभापती पण या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील.
दरम्यान वर्ग क्षेणी ड मधील कर्मचारी या योजनेसाठी अर्ज करु शकतील. ज्या शेतकऱ्यांचे नाव १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जमिनीच्या कागदपत्रावर नाव असेल त्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळतील. या तारखेनंतर जर जमीन खरेदी- विक्री नंतर जमिनीच्या कागदपत्रात मालकी हक्काविषयी काही बदल झाले तर त्यांना पांच वर्षापर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. जर आपल्या कुंटुंबातील व्यक्तींच्या नावावर जमिनीची मालकी दिली जाईल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

पीएम - किसान योजनेसाठी असलेले टोल फ्री नंबर 
जर आपल्याला या योजनेचा पैसा मिळाला नसेल तर तुम्ही फोन करु त्याविषयीची चौकशी करु शकता. यासाठी सरकारने काही टोल फ्री नंबर दिले आहेत. दरम्यान तुम्ही लेखापाल, जिल्हा कृषी अधिकाऱ्याला संपर्क करु शकता. जर तेथे तुमच्या समस्येची निरसन झाले नाहीतर तुम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या मदत लाईनवर संपर्क करु शकता. ((PM-Kisan Helpline 155261 या 1800115526) जर येथी ही समस्येचे निरसन झाले नाहीतर मंत्रालयाच्या या दुसऱ्या 011-23381092 नंबर संपर्क करा.
राज्य नोडल अधिकाऱ्याचा फोन नंबर -
Spl. IGP (SCRB), CID,Pune 020-25668441
ig[dot]scrb[dot]pune[at]mahapolice[dot]gov[dot]in

English Summary: pm kisan scheme status, application, documents information get all here
Published on: 28 March 2020, 02:07 IST