तुम्ही देखील पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) 10 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (PM Kisan) नोंदणी केली आहे तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पाठवला जाईल.
पीएम किसान योजनेचा लाभ (Benefits of PM Kisan Yojana)
10 व्या हफ्त्याची सुविधा फक्त 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल.देशातील 11.37 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे आत्तापर्यंत केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत भारतातील सुमारे 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1.58 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये देते.
10 वा हप्ता हवा असेल काय काळजी घेण आवश्यक आहे
तुम्ही अर्ज केला असेल तर त्यातील काही चुका असतील त्या वेळीच दुरुस्त करून घ्या. शेतकऱ्याचे नाव इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे. अर्ज करत असताना अर्जदाराचे नाव मराठीत टाकू नका. अर्जामध्ये पात्र शेतकऱ्याचं नाव आणि बँक खात्याच्या तपशीलात शेतकऱ्याच्या नावाची स्पेलिंग वेगवेगळी ठेवू नका.आधार कार्डावर जे नाव आहे त्याच प्रमाणे नाव अर्जावर असणं आवश्यक आहे. बँकेचा आयएफएससी कोड चुकीचा असल्यास पैसे अडकतील त्यामुळे बँकेचा तपशील नीट भरणे आवश्यक आहे. बँक खाते क्रमांक योग्य नसल्यास पैसे अडकतील.
Published on: 10 November 2021, 06:13 IST