Others News

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) यातून आतापर्यंत देशातील ९.८५ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य दिले जाते. आर्थिक मदत म्हणून सरकारकडून शेतकऱ्यांना २ हजार रुपये दिले जातात.

Updated on 17 June, 2020 4:49 PM IST


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) यातून आतापर्यंत  देशातील ९.८५ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य दिले जाते. आर्थिक मदत म्हणून सरकारकडून शेतकऱ्यांना २ हजार रुपये दिले जातात.  दरवर्षी ६००० रूपये थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात देणारी ही देशातील सर्वात मोठी योजना आहे.

दरम्यान या योजनेचा हा सहावा हप्ता आहे, पण या हप्ता पाठविण्यापूर्वी सरकारने लाभार्थ्यांना मोबाईलवर एक संदेश पाठवला आहे.  हा संदेश शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.  या संदेशामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.सरकारकडून पाठवण्यात आलेल्या संदेशात एक लाभार्थ्यांना एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.  लाभार्थी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून त्यांच्या अर्जाची, खात्याची स्थिती जाणून घेऊ शकतात.  पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, प्रिय शेतकरी, आता आपण अर्जाची स्थिती PM-KISAN ची हेल्पलाईन नंबर ०११-२४३००६०६ वर कॉल करू जाणून घेऊ शकता.  नोंदणी झालेल्या आपल्या मोबाईल नंबरवरून आपण थेट संपर्क करू शकता.

या योजनेचा आत्तापर्यंत ९.५४ कोटी शेतकऱ्यांची डाटा पडताळणी झाली आहे. तर १.३ कोटी शेतकऱ्यांना अर्ज करून आणि पोर्टलवर नाव येऊन देखील लाभ मिळालेला नाही.  अशा शेतकऱ्यांना या हेल्पलाईनवर संपर्क करून आपली समस्या मांडता येणार आहे.  पीएम किसान योजनेसंदर्भातील कोणत्याही अडचणी किंवा तक्रारींसाठी शेतकरी ०१२०-६०२५१०९ या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.  यासह योजनेविषयीची कोणतीही माहिती मेलव्दारेही मागवू शकतात.  यासाठी शेतकऱ्याला pmkisan-ict@gov.in या मेल आयडीवर संपर्क करावा लागेल. 

English Summary: PM-Kisan Scheme: government send message to farmer before six installment of scheme
Published on: 17 June 2020, 04:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)