पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभऱातील कोट्य़वधी शेतकऱ्यांसाठी अनेक लाभकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमध्ये पंतप्रधान किसान योजना खुप महत्त्वाची आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला ६ हजार रुपये टाकत असते. हा पैसा तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जातो. दरम्यान मोदी सरकारने ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १६ हजार १४६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाठवला आहे. त्याबरोबर सरकारने १० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात १६२ कोटी रुपये जमा केलेले आहेत. दरम्यान जर आपण या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि आपले नाव यादीत आहे का नाही हे आपण घरी बसून तपासू शकता.
कसे पाहणार ऑनलाईन आपले नाव - यासाठी आपण pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे. आपण या योजनेसाठी अर्ज करु इच्छित आहात तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता. दरम्यान सरकारने पंतप्रधान किसान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले आहेत. जर आपल्याला आपले नाव पाहायचे असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता. या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची यादी आपण येथे पाहू शकता. पंतप्रधान किसान सन्मान निधी २०२० ची यादी तपासण्यासाठी pmkisan.gov.in या लिंकवर आपल्याला जावे लागेल.
कशाप्रकारे मिळणार योजनेचा पैसा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ६ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जाते. प्रत्येक टप्प्यात २ हजार रुपये दिले जात असून हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. पैसे आपल्या खात्यात आल्याची माहिती मोबाईलवर मेसेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाते.
कसा करणार योजनेसाठी अर्ज - योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता. किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता. याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम - योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.
मोबाईल ऐपच्या मदतीने कसे तपासा सन्मान निधी योजनेची यादी
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य केले जाते. याची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी केंद्र सरकारने मोबाईल ऐप सुरू केले आहे. या मोबाईल ऐपच्या माध्यमातून तुम्ही पीएम - किसान योजनेची माहिती मिळवू शकता.
पीएम- किसान मोबाईल ऐप कसे डाऊनलोड करणार
आपल्या Android मोबाईलच्या प्ले स्टोर वर जावे. तेथे सर्च टॅबवर PMKISAN GoI Application ला डाऊनलोड करावे. डाऊनलोड केल्यानंतर अॅप्लीकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर एक होम पेज दिसेल. या होम पेजवर आपल्याला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व सेवा दिसतील. Check Beneficiary Status , Edit Aadhaar Details , Self Registered Farmer Status , New Farmer registration , About the schem , PM -Kisan Helpline आदी.
Published on: 24 April 2020, 06:33 IST