पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा (Pradhanmantri kisan sanman yojana ) आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार आहे. देशातील ११ कोटी पेक्षा जास्त शेतकरी मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा घेत आहे. शेतकरी आपल्या खिश्यातील एकही पैसा खर्च न करता दर महिन्याला तीन हजार रुपये मिळवू शकतील, पण फारच कमी शेतकऱ्यांना माहिती आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यासाठी कोणतेच कागदपत्र द्यावे लागत नाही. तुम्ही विचार करत असाल की, कोणत्या योजनेतून शेतकऱ्यांना इतका पैसा मिळतो. आम्ही पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेविषयी बोलत आहोत. जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. त्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देते. मानधन योजनेसाठी कोणतेच कागदपत्र लागत नाही.
हेही वाचा : खावटी कर्ज योजना काय आहे? कोण आहे पात्र, कोणाला मिळतो पैसा ; वाचा संपुर्ण माहिती
शेतकऱ्यांना मिळतील ३६००० रुपये
पीएम किसान मानधन(Pradhanmantri kisan mandhan) योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱयांना दर महिन्याला पेन्शन देते. ज्यामध्ये वयाच्या ६० वर्षानंतर मासिक पेन्शन ३००० हजार रुपये म्हणजेच ३६ हजार रुपये दिले जातात. जर एखादा शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र देण्याची गरज भासत नाही.
पीएम किसान योजनेतून मिळणारा पैसा थेट त्यात वळता करता येण्याचा पर्याय आहे. यामुळे शेतकऱ्याला आपल्या खिश्यातून पैसे देण्याची गरज राहणार नाही.
Published on: 22 April 2021, 09:53 IST