पीएम किसान मानधन योजनेतून शेतकरी दरवर्षी 36000 रुपयांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये म्हणजेच वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर वार्षिक 36000 रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहेत. पीएम किसान मानधन योजनेंतर्गत सरकारी नोकऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन मिळते.
या वयाच्या लोकांसाठी आहे योजना
18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी या पीएम किसान मानधन योजनेत सहभागी होऊ शकतो. योजनेतील वयानुसार हप्त्याची रक्कम निश्चित केली जाते. यासाठी दरमहा रु.55 ते रु.200 असे योगदान आहे. हा पेन्शन फंड भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे व्यवस्थापित केला जातो. 18 ते 29 वयोगटातील शेतकऱ्यांना 55 ते 19 रुपयांच्या दरम्यान हप्ता भरावा लागेल. 39 ते 39 वयोगटातील शेतकऱ्यांना 110 ते 199 रुपयांच्या दरम्यान हप्ता भरावा लागेल. वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. जर अर्जदार आधीच पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला वेगळे कागदपत्र सादर करावे लागणार नाही.
हेही वाचा : पोस्टाची गुंतवणूक योजना: पोस्टाच्याया योजनेत शंभर रुपये पासून सुरू करू शकता गुंतवणूक,मिळेल भरपूर फायदा
कागदपत्रे
आधार कार्ड
बँक खाते तपशिलासाठी पासबुक प्रत,पीएम किसान माधन योजनेसाठी शेतकऱ्याला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन स्वत:ची नोंदणी करावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारकार्डची प्रत आणि सातबाराची प्रत द्यावी लागेल. यासोबतच शेतकऱ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि बँकेचे पासबुकही जोडावे लागणार आहे. नोंदणी दरम्यान, शेतकऱ्याचे पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड तयार केले जाईल.
Published on: 31 December 2021, 08:56 IST