Others News

गेल्या मागील वर्षापासून कोरोना मुळे अनेक जणांवर बेरोजगार ची कुऱ्हाड कोसळली आहे. हा आकडा जवळचा कोटीच्या घरात आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लोक डाऊन मुळे सगळ्या आस्थापना व उद्योग ठप्प झाल्याने नोकर कपात करण्यात आली. परंतु अशातच एक व्यवसायाची सुवर्णसंधी चालून आली आहे. या महामारी च्या च्या काळामध्ये औषधांचा खप हा झपाट्याने वाढला आहे. कशात तुम्ही फार्म क्षेत्राशी संबंधित व्यवसायातून चांगले पैसे कमवू शकता. यात विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता केंद्र सरकारकडून मदतीचा हात पुढे केला गेला आहे. नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान भारतीय जन औषधि केंद्र सुरू केले आहे.

Updated on 16 June, 2021 10:21 AM IST

 पंतप्रधान जन औषधी केंद्र योजनेअंतर्गत मार्च दोन हजार चोवीस पर्यंत देशभरात अशा प्रकारच्या केंद्रांची संख्या वाढवून दहा हजार करण्याचा सरकारचा मानस आहे.

 अलिकडेच केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख  मंडविया यांनी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यामध्ये  प्रागपुर येथे जनऔषधि केंद्राचे उद्घाटन केले. त्या वेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान जन औषधी केंद्र योजनेअंतर्गत दहा हजार आस्थापने उघडण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल सांगितले. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य आणि गरजू लोकांना कमी किमतीमध्ये औषधे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

 यामध्ये दुकानदाराला मिळतो 20 टक्के वाटा

 या योजनेद्वारे देशात जास्तीत जास्त जन औषधी केंद्र उघडावेत यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. या केंद्राच्या माध्यमातून जे उत्पन्न येईल त्यातील 20 टक्के वाटा हा दुकान चालवणार्‍याला दिला जातो  तसेच प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो.

 जन औषधी केंद्र उघडण्यासाठी लागणारा खर्च सरकार देते परत

 नॉर्मल इंसेंटिव मध्ये सरकार दुकान उघडण्यासाठी जो काही खर्च येतो तोदेखील परत देते. यामध्ये दीड लाखांपर्यंत चे फर्निचर, कम्प्युटर आणि फ्रीज साठी पन्नास हजारापर्यंत रक्कम दिली जाते. परंतु ही दोन लाखाची रक्कम ही टप्प्याटप्प्याने परत केली जाते.

 ही केंद्रे कोण सुरू करू शकते?

1-बेरोजगार फार्मसिस्ट, सामान्य व्यक्ती, डॉक्टर आणि नोंदणी  कृत मेडिकल व्यावसायिक ही केंद्र सुरू करू शकतात.

2- ट्रस्ट, स्वयं सेवी संस्था, खासगी रुग्णालय, स्वयंसहायता गट यांचा समावेश आहे.

3-राज्य सरकारकडून शिफारस करण्यात आलेल्या संस्था.

 जन औषधी केंद्र सुरु करण्यासाठीरिटेल ड्रग्स सेलचा परवाना घ्यावा लागतो. यासाठी तुम्ही  https://janaushadi.gov.in/ या संकेत स्थळावरून फॉर्म डाउनलोड करू शकता. हा फॉर्म भरून ब्युरो ऑफ फार्मा  पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजर कडेपाठवावा लागतो.

 माहिती स्त्रोत- दिव्य मराठी

English Summary: pm janaushdi yojna
Published on: 16 June 2021, 10:21 IST