देशात चालू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारने अनेक दिलासादायक निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे आर्थिक नुकसानाचा भार कमी झाला आहे. सरकार या लॉकडाऊनच्या काळातच आता प्रधानमंत्री जन धन खात्यात ५०० रुपये टाकणार आहे. हे पैसे याच महिन्यात आपल्या बँक खात्यात टाकले जातील अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे. प्रत्येक प्रधानमंत्री जन धन योजानेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या बँक खात्यात ही सानुग्रह अनुदान देयक रक्कम ५०० रुपये टाकले जाणार आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून ही रक्कम पुढील तीन महिन्यासाठी दिली जाणार आहे.
लाभार्थ्यांना पैसे देताना सोशल डिस्टंसचे भान राखावे, अशा सुचना अर्थ मंत्रालयाकडून बँकांना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाने देयकाची वाटप कशाप्रकारे केली जाईल त्याविषयी एक वेळापत्रक दिले आहे. हे वेळापत्रक आपल्या बँक खात्याच्या क्रमांकावर आधारित आहे. खात्याच्या शेवटच्या अंकानुसार वाटपाची विभागाणी केली गेली आहे.
PMJDY च्या अंतर्ग खाते क्रमांकाच्या शेवटचा अंक | कोणत्या तारखेला पैसे काढता येतील |
० किंवा १ | ३.४.२०२० |
२ किंवा ३ | ४.४.२०२० |
४ किंवा ५ | ७.४.२०२० |
6 or 7 ६ किंवा ७ | ८.४.२०२० |
८ किंवा ९ | ९.४.२०२० |
९ एप्रिलनंतर लाभार्थी आपल्या इतर सामान्य बँकेत जाऊ शकतील. ९ तारखेनंतर आपल्याला जन-धन खात्यातील ही रक्कम काढता येणार पण ही रक्कम बँका लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करेल. दरम्यान जन धनचे पैसे खात्यात आल्यानंतर बँकांकडून लाभार्थ्यांना एक संदेश पाठविण्यात येणार आहे. सदर संदेश खालील प्रमाणे असेल.
''आम्ही तुमची काळजी घेत आहोत!. 'प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत एप्रिल महिना २०२० साठीचे पैसे ५०० रुपये दर महा महिला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करत आहोत. आपली गैरसोय होऊ नये यासाठी उद्या दिनांक..... ला ही रक्कम काढण्यासाठी कृपया आपल्या बँकेला भेट द्यावी'. सुरक्षित रहा निरोगी रहा !
Published on: 03 April 2020, 04:28 IST