केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी निरंतर वेगवेगळ्या पद्धतीचे पावले उचलताना दिसत आहे. वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी प्रवृत्त करीत आहे.
केंद्र सरकारच्या अशा विविध योजना आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे पी एम किसान एफ पी ओ योजना. नेमकी ही योजना काय आहे? त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
काय आहे ही योजना?
केंद्र सरकारने पी एम किसान एफपी ओ योजना ची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी ला म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ला पंधरा लाख रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी 11 शेतकऱ्यांनी मिळून एक कंपनी बनवावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा हा कृषी संबंधित उपकरणे किंवा फर्टिलायझर्स, विज किंवा औषध खरेदी साठी या योजनेचा फायदा होतो.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पी एम किसान एफ पी ओ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण सरकारने अजून या योजनेचीनोंदणी प्रक्रिया सुरू केलेली नाही. मीडिया रिपोर्ट नुसार लवकर सरकार या योजनेसंबंधी अधिसूचना जारी करणार आहे.
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना पीएम किसान योजना
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना पैकी एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही होय.योजना केंद्र सरकार अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांसाठी 2019 मध्ये सुरू केली होती.या पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनादरवर्षी सहा हजार याप्रमाणेएका वर्षात तीनदा दोन हजार रुपये याप्रमाणे विभागून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जातात. या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता हा एक एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता हा एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता हा एक डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो.
Published on: 01 July 2021, 07:10 IST