मागच्या वर्षी केंद्र सरकारने अर्थात नरेंद्र मोदी यांनी पी एम केअर फोर चिल्ड्रन या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य सहज शिक्षण आणि वैद्यकीय विम्याची सुविधा जाहीर केली होती.
या योजनेच्या माध्यमातून ज्या मुलांनी कोरोना महामारी आपल्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र गमावले अशा मुलांना त्यांच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड मिळेल असे त्यांनी सांगितले होते. संबंधित मुलांचे वय 23 वर्ष होईल तेव्हा या योजनेतील पात्र मुलांना एम केअर फंडातून एकरकमी दहा लाख रुपये दिले जातील. एवढेच नाही तर अशा मुलांना मोफत शिक्षण तसेच त्यांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज सुविधा तसेच त्यांचं व्याज पेटीएम केअर फंडातून दिले जाईल असे ते म्हणाले होते. भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पी एम केअर फंड चिल्ड्रन योजनेच्या नोंदणीची तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. यासंदर्भात मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना तसेच महिला आणि बालविकास, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाला पत्र दिले असून त्याची परत सर्व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकार्यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.
या योजनेसाठी पात्रतेचे निकष
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने कोरोनाला जागतिक महामारी घोषित केल्याच्या 11 मार्च 2020 या तारखेपासून ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपले दोन्ही पालक किंवा एकमेव पालक गमावले आहेत अशी मुले या योजनेसाठी पात्र ठरतील. यामध्ये कायदेशीर पालक/ दत्तक पालक/एकल पालक यांचाही समावेश आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांच्या मृत्यूच्या तारखेला मुलाचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असावे.
या योजनेचा उद्देश
या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे याद्वारे मुलांची आरोग्यविमा च्या माध्यमातून काळजी घेणे तसेच त्यांना शिक्षण देऊन सशक्त आणि सक्षम बनवणे आहे.त्याच्या मुलांनी यामध्ये आपले पालक गमावले अशा मुलांना वयाच्या तेविसाव्या वर्षी दहा लाखांची आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबी करण्यासाठी सरकारी मदतीची ही घोषणा केली आहे.
इतकेच नाही तर पीएम केअर फोर चिल्ड्रन या योजनेमध्ये मुलांचा सर्वांगिन दृष्टीकोण,शिक्षण, आरोग्यासाठी निधी तसेच वयाच्या आठराव्या वर्षापासून मासिक स्टायपेंड आणि तेवीस वर्षाचे झाल्यावर दहा लाख रुपयांची एकरकमी रक्कम मदत म्हणून देते.
या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी
https://pmcaresforchildren.in ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे.(स्त्रोत-news18 लोकमत)
Published on: 24 February 2022, 12:11 IST