देशातील सर्व नागरिकांना आपल्या स्वता चे घर मिळावे यासाठी मोदी सरकारने प्रधामंत्री आवास योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यामातून २.६७ लाख रुपयांचे अनुदानही दिले जाते. जर आपल्याला घर बांधायचे असेल किंवा विकत घ्यायचे असेल तर आपल्यासाठी ही योजना खूप फायदेकारक असणार आहे. यासाठी आपण बँक किंवा एनबीएफसीमध्ये अर्ज करु शकतात. याशिवाय आपण ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करु शकतात. परंतु ऑनलाईन करताना अनेक प्रकारच्या चुका आपल्याकडून होत असतात. यासाठी या योजनेत ऑनलाईन अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. जेणेकरून अर्ज भरताना आपल्याकडून काही चुका होऊ नयेत.
- सर्वात आधी पीएम आवास योजनाच्या अधिकृत संकेतस्थळ http://pmaymis.gov.in ओपन करावी.
- होमपेजवर citizen Assessment मध्ये असलेल्या Benfits under other 3 componenets वर क्लिक करावे.
- check Aadhar /VID No. Existence या शीर्षकाचे नवे पेज ओपन होईल. तेथे आधार नंबरची नोंदणी करा. त्यानंतर check बटन दाबा.
- त्यानंतर तुम्ही एप्लीकेशन फॉर्म म्हणजे ऑनलाईन फार्मवर रिडायरेक्ट केले जाईल.
- आपल्या समोर एक अर्ज ओपन होईल, त्यात आवश्यक असलेली माहिती काळजीपूर्वक भरा. लाभार्भीचे नाव, मोबाईल, नंबर, ईमेल, सर्व वैयक्तिक माहिती, इनकम स्टेटमेंट, बँक खात्याची माहिती आदी गोष्टी यात विचारल्या जातील.
- आता कॅप्चा कोड नोंदवा, आणि सेव्ह वर क्लिक करुन फाईल सेव्ह करा, आपल्या आवश्यक असल्याच प्रिंट आऊटही घेऊ शकतात.
Published on: 10 August 2020, 06:52 IST