Others News

प्रत्येकाचे घर व्हावे, प्रत्येकांची स्वप्न पुर्ण व्हावीत यासाठी सरकारने २५ जून २०१५ रोजी पंतप्रधान आवास योजना सुरू केली होती. साधरण ३१ मार्च २०२२ पर्यंत २ कोटी घरांचं निर्माण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. या योजनेअंतर्गत, जर कोणी प्रथमच घर विकत घेत असेल तर त्याला क्रेडिट लिंक्ड सब्सिडी दिली जाईल.

Updated on 30 April, 2020 4:37 PM IST


प्रत्येकाचे घर व्हावे, प्रत्येकांची स्वप्न पुर्ण व्हावीत यासाठी सरकारने २५ जून २०१५ रोजी पंतप्रधान आवास योजना सुरू केली होती. साधरण ३१ मार्च २०२२ पर्यंत २ कोटी घरांचं निर्माण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.   या योजनेअंतर्गत, जर कोणी प्रथमच घर विकत घेत असेल तर त्याला क्रेडिट लिंक्ड सब्सिडी दिली जाईल. घर खरेदी करण्यासाठी गृह कर्जावरील व्याजवर अनुदान, या अनुदानाची राशी २. ६७ लाखांपर्यंत असेल. ही योजना केंद्र सरकारच्या मार्फत ही योजना राबवली जाते.

योजनेनुसार निश्चित होणार कॅटेगरी

पहिली आणि दुसरी कॅटेगरी -

 - यातील ३ लाख ते ६ लाख वर्षाचे उत्पन्न असलेले व्यक्ती इकोनॉमिकली वीकर सेक्शन (EWS)  आणि लोअर इनकम ग्रुप (LIG) वाले असतील.

चौथी कॅटेगरी - यात १२ ते १८ लाख वर्षाचे उत्पन्न कमावणारे असतील. मध्यमवर्गीय इनकम ग्रुप २ MIG2

या कॅटेगिरीतील व्यक्तींना मिळेल सब्सिडीचा लाभ

इकोनॉमिकली वीकर सेक्शन, लोअर इनकम ग्रुप यांना अनुदानाचा लाभ हा ३१ मार्च २०२२ पर्यंत मिळेल. पण मध्यमवर्गीय इनकम ग्रुप १ आणि मध्यमवर्गीय इनकम ग्रुप २ मधील लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२० पर्यंत अर्ज करणाऱ्यांनाच या सब्सिडीचा लाभ मिळाला आहे. दरम्यान या दोन्ही गटातील लोकांना सब्सिडीचा लाभ मिळण्याची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी होत आहे.   जर आपल्याला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला लॉकडाऊन उघडण्याची वाट पाहावी लागणार आहे. लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतरच आपल्या या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

वेतन स्लीप , पे स्लीप , सैलरीड क्लास (Salaried Class)

ओळखपत्र - पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, सरकारकडून देण्यात आलेले ओळख पत्र, सरकारी अधिकाऱ्यांकडून असलेले पत्र. राहण्याचा पत्ता, मतदान कार्ड,  जीवन विमा पॉलिसी (एलआयसी), रेसिडेंस एड्रेस सर्टिफिकेट, करारपत्र, बँकेच्या पासबुक, उत्पन्न दाखला, बँकेच्या सहा महिन्याचा तपशील, इनकम टॅक्स रिटर्न भरल्याचा अर्ज. मागील दोन महिन्याची सॅलरी स्लीप, प्रॉपर्टी पुरावा, सेल्स डीड, खरेदीचे करार पत्र. 

पगार नसलेला वर्ग

ओळख पुरावा, पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, सरकारकडून देण्यात आलेले ओळख पत्र, सरकारी अधिकाऱ्यांकडून असलेले पत्र. राहण्याचा पत्ता, मतदान कार्ड,  पासपोर्ट, युटिलिटी बिल, यात टेलिफोन बिल, गॅसचे बिल, विज बिल.  कमर्शियल नॅशनलाइज्ड बँकेकडून मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट,  पोस्ट ऑफिसमधील सेव्हिंग खात्यावरील पत्ता, जीवन विमा पॉलिसी, रहिवाशी दाखला. पासबुक वरील पत्ता, आपले दुकान, फर्म, कंपनी मालकीच्या बाबतीत पत्ता पुरावा

  • दुकान व आस्थापना प्रमाणपत्र (Shop and Establishment Certificate)
  • व्यापार परवाना प्रमाणपत्र(Trend license Certificate)
  • एसएसआय नोंदणी प्रमाणपत्र, 
  • पॅन कार्ड, विक्री कर / व्हॅट प्रमाणपत्र,
  • फर्म असल्यास भागीदारीचा करार
  • फॅक्टर नोंदणी प्रमाणपत्र
  • आयात कोड निर्यात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा पुरावा(Income Proof)
  • मागील 2 आर्थिक वर्षांचा आयटीआर (Income Tax Return)
  • आपले बचत खाते, नफा आणि तोट्याची माहिती (बॅलन्स सीट )
  • सहा महिन्यातील  बचत खात्यांचे स्टेटमेंट आणि व्यवसाय एंटिटी घटकासाठी सहा महिन्याचे चालू खात्याचे स्टेंटमेंट.
  • प्रॉपर्टी पुरवा,
  • मालमत्तेची कागदपत्रे.
  • कराराची प्रत.
  • देय पावती.

English Summary: Pm Awas Yojana 2020 : complete your own house dream, know details of documents
Published on: 30 April 2020, 04:36 IST