Others News

Phonepe : मित्रांनो अलीकडे घरी बसून देखील काहीच न करता पैसे कमवले जाऊ शकतात. तुम्हाला सांगितले की तुम्ही घरी बसून दिवसाला एक हजार रुपये कमवू शकता, तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण ही बातमी अगदी खरी आहे

Updated on 04 October, 2022 10:50 PM IST

Phonepe : मित्रांनो अलीकडे घरी बसून देखील काहीच न करता पैसे कमवले जाऊ शकतात. तुम्हाला सांगितले की तुम्ही घरी बसून दिवसाला एक हजार रुपये कमवू शकता, तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण ही बातमी अगदी खरी आहे

आज आम्ही तुम्हाला घरी बसून दिवसाला एक हजार रुपये कसे कमवू शकता याबद्दल सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या फोनद्वारे हे पैसे कमवू (Earn Money) शकता, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये अॅप डाउनलोड करावे लागेल, ज्यावर तुम्ही छोटे-मोठे काम करून दिवसाला एक हजार रुपये कमवू शकता.

PhonePe वर पैसे कमवा

PhonePe हे अलीकडे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे एक विश्वासू अप्लिकेशन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे अँप्लिकेशन रिलायन्सचे पेमेंट अॅप आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या बँकेतून कोणालाही थेट पैसे देऊ शकता. पण तुमच्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल की यातून पैसेही कमावता येतात.

मित्रांनो हे ॲप्लिकेशन इतरांना शेअर केल्यास आणि त्या संबंधित व्यक्तीने हे अप्लिकेशन इन्स्टॉल करून लॉगिन घेतल्यास फोनपे कडून शंभर रुपये दिले जातात. तुम्ही हे अॅप एका दिवसात 10 लोकांसोबत शेअर केल्यास तुम्ही ₹ 1000 कमवू शकता. म्हणूनच तुम्ही हे काम लवकरात लवकर सुरू करावे कारण तुम्ही कष्ट न करता पैसे कमवू शकता.

ही आहे संपूर्ण प्रक्रिया

या प्रक्रियेतून जाण्यासाठी, तुम्हाला प्रथम फोनवर PhonePe अॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर, तुम्हाला खाते उघडावे लागेल आणि केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या होम पेजवर जाल, तिथे तुम्हाला Refer and Earn चा पर्याय दिसेल.

याद्वारे तुम्ही हे अॅप शेअर कराल आणि जितके लोक तुमच्या शेअर केलेल्या लिंकवरून अॅप डाउनलोड करतील तितके तुम्हाला पैसे अधिक मिळतील. समजा जर तुम्ही हे एप्लीकेशन दहा लोकांना शेअर केले आणि त्या सर्व लोकांनी हे आपलिकेशन त्यांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड केले तर तुम्हाला एक हजार रुपये मिळणार आहेत.

English Summary: phonepe earn money via phonepe
Published on: 04 October 2022, 10:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)