मागील बऱ्याच महिन्यांपासून प्रत्येकच गोष्टीत महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड आर्थिक स्वरूपाचे हाल बघायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी तर महागाईचा कळस गाठल्याचे बघायला मिळाले होते. कालांतराने केंद्र आणि राज्य सरकारच्या काही निर्णयांमुळे थोडासा दिलासा मिळाला. परंतु तो दिलासा देखील अजून हवा त्या प्रमाणात नाही.
परंतु या सगळ्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एक बातमी समोर येत असून ती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलच्या म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमती मध्ये सात महिन्याच्या नीचांकी पातळीवर घसरण झाली आहे.
याचा परिणाम हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्यावर होईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. जर आपण या क्षेत्रातील तज्ञांचा मताचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर तीन रुपयांनी स्वस्त होऊ शकेल.
सध्या कच्च्या तेलाची परिस्थिती
कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरूच असून जून महिन्याचा विचार केला तर क्रुड ऑइल 125 डॉलर प्रती बॅरल पर्यंत होते. सध्याचा विचार केला तर ते घसरून प्रति बॅरल 92 डॉलर प्रती बॅरल अशा पातळीवर आहे. या सगळ्या आकडेवारीचा विचार केला तर आतापर्यंत 26 टक्क्यांनी ते कमकुवत झाले आहे.
जागतिक परिस्थितीचा विचार केला तर युरोप आणि चीनसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर दबाव असून इतर अनेक अर्थव्यवस्था अजून देखील अनिश्चित स्वरूपात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर क्रूडची मागणी येणाऱ्या काळात देखील कमजोर राहील अशी भीती आहे.
तज्ञांच्या मते येणाऱ्या काही दिवसात कच्चे तेल हे 85 डॉलर प्रति बॅरल पर्यंत खाली येण्याची शक्यता असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
जर आपण सध्याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा विचार केला तर 22 मे पासून जेव्हा केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे आठ आणि सहा रुपयांनी कपात केले तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ झाली नसून दर स्थिर आहेत.
नक्की वाचा:गॅसच्या किमती कमी करून मोदी सरकार देणार सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट? घेतला मोठा निर्णय..
Published on: 08 September 2022, 01:26 IST