Others News

Petrol Diesel Prices: देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे.

Updated on 11 October, 2022 10:10 AM IST

Petrol Diesel Prices: देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) दर शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे.

मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत जागतिक बाजारात $95.60 प्रति बॅरलपर्यंत घसरली आहे, तर WTI प्रति बॅरल $90.62 वर पोहोचली आहे. मात्र, या किमती गेल्या महिन्यातील पातळीपेक्षा खूपच जास्त आहेत.

इथे देशातील सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

हरियाणामध्ये पेट्रोल 0.23 रुपयांनी वाढून 97.52 रुपये/लिटर आणि डिझेल 0.22 रुपयांनी वाढून 90.36 रुपये/लिटर झाले आहे. हिमाचलमध्ये पेट्रोल 0.68 रुपयांनी वाढून 95.74 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.58 रुपयांनी वाढून 81.99 रुपये झाले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 50 पैशांची वाढ झाली आहे. याशिवाय पंजाब आणि राजस्थानमध्ये किमतीत किंचित वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांनो द्या लक्ष! या कागदपत्रांशिवाय पीक विमा मिळणार नाही; जाणून घ्या सविस्तर

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

चांगल्या उत्पादनासाठी देशी की हायब्रीड बियाणे? जाणून घ्या कोणते बियाणे दर्जेदार

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी (Excise duty), डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

महत्वाच्या बातम्या:
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! सोने 5080 रुपयांनी स्वस्त; फटाफट चेक करा नवे दर
मुसळधार पावसाचा कहर! कापूस, सोयाबीन पिकासह उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान; शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

English Summary: Petrol Diesel Prices: Petrol and diesel price hike, check new rates...
Published on: 11 October 2022, 10:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)