Others News

Petrol Diesel Price Today: रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा (inflation) भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक क्षेत्रावर परिणाम होऊन सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत.

Updated on 04 October, 2022 9:42 AM IST

Petrol Diesel Price Today: रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा (inflation) भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक क्षेत्रावर परिणाम होऊन सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत.

इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी मंगळवारी (४ ऑक्टोबर) पेट्रोल (petrol) आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.

अशाप्रकारे आज सलग १३६ वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महागाईच्या आघाडीवर आजही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $85 आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

आनंदाची बातमी! 17 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो 12 वा हप्ता

त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

भारीच की! लिंबाच्या एका झाडापासून मिळणार ६० किलो उत्पन्न; बाजारात आली नवीन जात

मुख्य शहरातील किंमत

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63  रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुवनंतपुरम : पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52  रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

महत्वाच्या बातम्या:
राज्यातील शेतकरी चारही बाजूने संकटात! मुसळधार पावसाने फुलशेती उध्वस्त; शेतकरी अडचणीत
दिलासादायक! 72 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण; लम्पी त्वचा रोगाला रोखण्यासाठी राज्य सरकारचा कसून प्रयत्न

English Summary: Petrol Diesel Price Today: Find out quickly whether petrol diesel has become cheaper or more expensive?
Published on: 04 October 2022, 09:42 IST