Petrol Diesel Price : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना नॉन-मिश्रित पेट्रोल किंवा डिझेलवर अधिक कर आकारण्याची घोषणा केली. त्यासाठी कंपन्यांना 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती.
मात्र मुदत संपण्याच्या दिवशी मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली. यामध्ये विशिष्ट प्रकारचे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी ग्राहकाला जास्त पैसे मोजावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काय आहे संपूर्ण बातमी, जाणून घेऊया.
पेट्रोलवर 2 रुपये जास्त मोजावे लागणार!
इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यास त्याला मिश्रित इंधन म्हणतात. इथेनॉल हे जैव इंधन आहे जे जाळल्यावर पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही. हे इंधन चलनात आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
याच कारणामुळे सरकार 1 ऑक्टोबरपासून इथेनॉलशिवाय पेट्रोलवर कर लावणार होते. मात्र आता सरकारने त्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच या दिवसापासून इथेनॉलविना पेट्रोल दोन रुपयांनी महागणार आहे. 1 नोव्हेंबर किंवा त्यानंतर तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले तर इथेनॉल शिवाय महाग होईल हे लक्षात ठेवा.
डिझेलवरही दोन रुपये अधिक कर लागणार!
यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना डिझेलवरही दोन रुपये अधिक कर आकारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठीची अंतिम मुदतही 1 ऑक्टोबर होती. परंतु, आता सरकारने त्याची मुदत 1 एप्रिल 2023 पर्यंत वाढवली आहे.
इथेनॉल किंवा मिथेनॉलशिवाय जास्त कर भरावा लागणार!
सध्या, सरकार पेट्रोलवर ₹ 1.40 प्रति लिटर दराने मूलभूत उत्पादन शुल्क आकारत आहे. 1 नोव्हेंबरपासून इथेनॉल किंवा मिथेनॉल नसलेल्या पेट्रोलवर प्रति लिटर 3.40 रुपये दराने कर आकारला जाईल.
त्याचप्रमाणे, डिझेलवर मूळ उत्पादन शुल्क ₹ 1.80 प्रति लिटर दराने आकारले जात आहे, 1 एप्रिल 2023 पासून इथेनॉल किंवा मिथेनॉलशिवाय डिझेलवर ₹ 3.80 प्रति लिटर दराने कर आकारला जाईल.
Published on: 01 October 2022, 11:48 IST