Others News

Petrol Diesel Price: देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महागाईच्या दिवसांतच भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. 90 वा दिवस असून यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Updated on 19 August, 2022 7:38 AM IST

Petrol Diesel Price: देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महागाईच्या (inflation) दिवसांतच भारतीय तेल कंपन्यांकडून (Indian Oil Companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. 90 वा दिवस असून यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise duty) प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Gold Price Today: आनंदाची बातमी! सोन्या चांदीचे दर घसरले; सोने मिळतंय तब्बल 4100 रुपयांनी स्वस्त...

यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती (Crude Oil) काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.

पीएम पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ, लाभ घेणाऱ्यांची संख्या घटली; जाणून घ्या कारण...

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.

महत्वाच्या बातम्या:
सावधान! कडधान्य आणि भाजीपाला पिकांवर रोगाचे सावट; होऊ शकते नुकसान
पशुपालकांनो सावधान! तुमची जनावरे विषारी चारा तर खात नाहीत ना? असा ओळखा चाऱ्यातील विषारी घटक

English Summary: Petrol Diesel Price: Fuel prices announced by petroleum companies!
Published on: 19 August 2022, 07:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)