Others News

कोरोना विषाणूमुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. शहरातील मजुर वर्ग आणि नोकरदारवर्ग परत आपल्या गावाकडे आला आहे. पण सर्वात जास्त फटका हा मजदूर आणि शेतकऱ्यांना बसला आहे

Updated on 18 July, 2020 5:56 PM IST


कोरोना विषाणूमुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला,  शहरातील मजूर वर्ग आणि नोकरदारवर्ग परत आपल्या गावाकडे आला आहे.  पण सर्वात जास्त फटका हा  मजदूर आणि शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान मनरेगामध्ये नाव नोंदणी झालेल्या मजुरांना लॉकडाऊन हटल्यानंतर काम मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून मजुरांना रोजगार दिला जात आहे.

परंतु प्रत्येक योजनांमध्ये भ्रष्टाचार घोटाळा होत असल्याने अनेक मजुरांच्या नावाने पैसे लाटणारे महारथी अनेक ठिकाणी आहेत.  या योजनेतून काम रोजगार मिळणे सुरु आहे का?  याची माहिती मजुरांना मिळत नाही, यामुळे मजुरांना आपल्या हक्काचा पैसा गमावावा लागतो आहे.  आज आम्ही तुम्हाला आपल्या मनरेगाच्या कामाची माहिती कशाप्रकारे मिळवायची, त्याची काय स्थिती आहे याची माहिती घ्यायची याची माहिती देणार आहोत. ही माहिती घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. ही माहिती आपल्याला घरी बसून मोबाईलमधून मिळणार आहे. जन मनरेगा नावाचे मोबाईल ऐप आपण डाऊनलोड करून याची माहिती घेऊ शकता.

जर आपण मनरेगाच्या अंतर्गत काम करत आहात तर आपल्यासाठी हे ऐप खूप उपयोगी आहे. मनरेगामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांविषयी आपल्याला माहिती यातून मिळणार आहे. इतकेच नाही तर या जन मनरेगा ऐपच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांना संबंधित विविध पैलूची माहिती आपण घेऊ शकतो. जर आपल्याला मनरेगाविषयी काही तक्रारी आहेत, किंवा काही सुचना आहेत तर त्याआपण याच्या माध्यमातून सांगू शकतात.

१९ जून २०१७ मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत हे ऐप सुरु करण्यात आले होते. तेव्हापासून आता पर्यंत यात अनेक अपडेट करण्यात आला आहे. आपल्याकडे स्मार्टफोन असेल तर आपण प्लेस्टोअरवर जाऊन सर्च बॉक्समध्ये जन मनरेगा टाईप करा. त्यानंतर इनस्टॉल करण्याचा पर्याय दिसेल , त्यावर क्लिक करा.

English Summary: People will get MGNREGA information from JAN MGNREGA, transparency will come to the scheme
Published on: 18 July 2020, 05:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)