Others News

देशातील रेशन कार्ड (Ration Card) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लाभार्थ्यांना रेशन घेण्यासाठी घराच्या बाहेर पडायचे आवश्यकता नाही. कोरोनाची दुसरी लाट चालू असताना घराबाहेर पडणे तितके सुरक्षित नाही.

Updated on 23 April, 2021 11:42 AM IST

देशातील रेशन कार्ड (Ration Card) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लाभार्थ्यांना रेशन घेण्यासाठी घराच्या बाहेर पडायचे आवश्यकता नाही.  कोरोनाची दुसरी लाट चालू असताना घराबाहेर पडणे तितके सुरक्षित नाही.

त्यासाठी सरकारने मेरा रेशन ॲप (Mera Ration APP) लॉन्च केले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि स्थलांतरित झालेल्यांना परवडणाऱ्या किमतीत धान्य मिळवून देण्यासाठी सरकारकडूनच ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) योजना चालवली जात आहे.

काय आहे मेरा रेशन ॲप (Mera Ration App)?

रेशन दुकान (Ration Shop) वर आपण जेव्हा पाहतो तो कायम गर्दी अनेक लांब रांग दिसते. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने मेरा रेशन ॲप लॉन्च केले आहे.  या ॲपद्वारेलाभार्थी आता आपल्या मोबाईल वरुन थेट घरीच रेशन मागवू शकता. या ॲपद्वारे तुम्ही रेशन बुक करू शकता. हे ॲप वन नेशन वन रेशन या योजनेचा एक भाग आहे. हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर (Google Play Store)वर जाऊन डाऊनलोड करा. हे ॲप इन्स्टॉलेशन केल्यानंतर उघडा आणि त्यात आपल्या रेशन कार्डचा सगळा तपशील भरल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होते व तुम्ही अप वरून रेशन लागू शकतात.

 हेही वाचा :  घरी बसून रेशन कार्डवरील अपडेट करा आपला मोबाईल नंबर; वाचा संपूर्ण प्रक्रिया

या ॲपचे फायदे

 या ॲपचा सर्वाधिक फायदा हा स्थलांतरित लोकांना जास्त होईल. कारण त्यांना स्थलांतरित झालेल्या ठिकाणी रेशन सेंटर कुठे आहे याबद्दल माहिती नसतं. परंतु या ॲपद्वारे या समस्येवर मात करता येईल. रेशन कार्ड धारक या ॲपच्या मदतीने रेशन कधी व कसे मिळवायचे यासह इतर माहिती घेण्यास सक्षम असतील. रेशन कार्ड धारक या ॲप द्वारे आपल्या सूचना किंवा तक्रारी देखील दाखल करू शकता.

 

 हे ॲप सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, परंतु लवकरच हे इतर चौदा भाषांमध्ये उपलब्ध होईल. बहुतेक लाभार्थ्यांना इतर भाषांची समस्या उद्भवू नये, म्हणून त्यांची सोय लक्षात घेता यामध्ये प्रमुख प्रादेशिक भाषा जोडल्या जाणार आहे. जेणेकरून लाभार्थ्यांना ॲप वापरतांना अडचणी येणार नाहीत. आतापर्यंत या योजनेशी 32 राज्य जोडले गेले आहेत.

English Summary: People can get ration in home by Mera ration App
Published on: 23 April 2021, 11:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)