Others News

आपल्या नावावर एखाद्या कार्यात विक्रम नोंदवण्याची अनेकांची इच्छा असते. अनोखे प्रयोग करून बरेचजण प्रयत्नही करतात. असाच एक विचित्र विक्रम अमेरिकेतील एका व्यक्तीने आपल्या नावावर केला आहे. ५३ वर्षीय बॉब सालेम असे या व्यक्तीचे नाव आहे.

Updated on 20 July, 2022 5:02 PM IST

आपल्या नावावर एखाद्या कार्यात विक्रम नोंदवण्याची अनेकांची इच्छा असते. अनोखे प्रयोग करून बरेचजण प्रयत्नही करतात. असाच एक विचित्र विक्रम अमेरिकेतील एका व्यक्तीने आपल्या नावावर केला आहे. ५३ वर्षीय बॉब सालेम असे या व्यक्तीचे नाव आहे. जगातील सर्वात अनोखा आणि अजब-गजब विक्रम मोडल्यामुळे सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीची बरीच चर्चा होत आहे.

बॉब सालेम या व्यक्तीने चक्क भूईमुगाची एक शेंग आपल्या नाकाने ढकलत ढकलत थेट हजारो फूट उंच पर्वताच्या शिखरावर पोहचवण्याचा अजब गजब विक्रम केला आहे. या २१व्या शतकात असा प्रयोग करणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. बॉब सालेम हे मूळचे मॅनिटो स्प्रिंग्स, कोलोरेंडो येथील आहेत.

त्यांनी ९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता या अनोख्या मोहिमेला सुरुवात केली. नाकाच्या मदतीने पाइक्स पर्वताच्या (पाइक्स पीक) १४,११५ फूट उंचीवर शेंग ढकलत ढकलत नेली. डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी त्यांना जवळजवळ ७ दिवसांचा कालावधी लागला. ९ जुलैला सुरुवात केलेली मोहीम १५ जुलै ला पार पडली.

त्यानंतर १० वाजता औपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनोखा विक्रम मोडल्याबद्ल शहराच्या महापौरांकडून बॉब सालेम यांचे सन्मान पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. वयाच्या ५३व्या वर्षी असा विक्रम नावावर केल्यामुळे सगळीकडून त्यांचे कौतुक होत आहे. आजच्या तरुण पिढीला लाजवेल अशी कामगिरी बॉब सालेम यांनी केली आहे.

सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसे? डाळ,तांदूळ दरात होणार मोठी वाढ

विक्रम मोडणारे बॉब सालेम चौथे व्यक्ती
भुईमुगाची शेंग डोंगरावर ढकलणारे बॉब सालेम इतिहासातील चौथे व्यक्ती ठरले आहेत. १९६३ साली युलिसिस बॅक्स्टरला पाइक्स पर्वतावर भुईमुगाची शेंग पोहोचण्यासाठी आठ दिवस लागले होते. हा विक्रम बॉब सालेम यांनी मोडला.

महत्वाच्या बातम्या:4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी वितरीत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
ई पीक नोंदणी नाहीये? तरीही काढता येणार विमा, शासनाने घेतला मोठा निर्णय

English Summary: Peanut pods on top of mountains; A wonderful record was made in the name
Published on: 20 July 2022, 05:02 IST