Others News

आरोग्यनिती आधार संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने योग स्पर्धा.

Updated on 24 May, 2022 2:13 PM IST

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही योग दिनानिमित्त आरोग्यनिती च्या वतीने योग स्पर्धेचे आयोजन.घरी बसून स्पर्धेत सहभागी व्हा आणि APL (आरोग्यनी प्रीमियर लीग) ची योग स्पर्धा जिंका.जर तुम्ही शास्त्रानुसार योगासने करु शकता तर तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता आणि बक्षीस जिंकु शकता.स्पर्धेचा विषय योगाशी संबंधित कोणताही विषय जसे की योगासन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, मुद्रा, विशिष्ट आजारासाठी योग, कोणत्याही योगासन/प्राणायाम/मुद्राचे उत्तम फायदे, अष्टांग योग/राजयोग/हठयोग म्हणजे काय, का करावे असे स्वतःच्या आवडीचा कोणताही विषय निवडू शकतात.वर दिलेल्या कोणत्याही विषयावर किंवा योगाशी संबंधित इतर कोणत्याही विषयावर आपण व्हिडियो बनवून आम्हाला पाठवू शकता.

स्पर्धेचे नियम:-स्पर्धेत सर्वांना एकत्र ग्राह्य धरले जाईल (स्त्री किंवा पुरुष, वय किंवा तुमची पदवी याचा काहीही फरक पडत नाही.) तुम्ही निवडलेल्या विषयात आसन, प्राणायाम, मुद्रा, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार असा कोणताही विषय घेऊन तुम्हाला तो नीट दाखवायचा आहे आणि प्रेक्षकांना सांगायचा आहे.स्पर्धेचे सर्व व्हिडियो 'योग - एक जीवन जिने का तरिका' या यूट्यूब चॅनलवर असतील म्हणाजे आपण सर्वांचे व्हिडिओ पाहू शकता. यामुळे कोणताही भेदभाव होणार नाही.स्पर्धेसाठी तुम्ही मराठी किंवा हिंदी कोणत्याही भाषेत व्हिडिओ बनवू शकता.स्पर्धेचा व्हिडियो हा कमीत कमी 4 मिनिटाचा व जास्तीत जास्त 10 मिनिटाचा असावा सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि पदक दिले जाईल.ही स्पर्धा विनामूल्य असून, शास्त्रानुसार योगाचा प्रचार करणे हाच तिचा उद्देश आहे.

आम्हाला स्पर्धेचा व्हिडिओ 21/05/2022 ते 05/06/2022 पर्यंत पाठवायचा आहे. 06/06/2022 रोजी सर्व व्हिडिओ 'योग-एक जीवन जीने का तरिका' या YouTube चॅनलवर अपलोड केले जातील.स्पर्धेच्या विजेत्यांची 23/06/2022 रोजी घोषणा केली जाईल. तुम्हीला फक्त व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवायचा आहे. ते कोणत्याही प्रकारे एडिट करू नका (त्यात गाणी किंवा कोणतेही फोटो टाकू नका) खालीलप्रमाणे विजेते घोषित केले जातील प्रेक्षक आणि जज हे विजेते ठरवतील 50% प्रेक्षक आणि ️ 50% न्ययाधीश प्रेक्षक:- तुमचा व्हिडिओ किती लोकांनी पाहिला आणि तुमच्या व्हिडिओला किती लाईक्स मिळाले, अशा प्रकारे 50% गुण असतील.जज- तुम्ही तुमच्या निवडलेल्या विषयावर अचूक माहिती कशी सांगितली आणि कशी दाखवली यावर 50% गुण असतील.

बक्षिसे 1St - 2501/-2nd -2001/-3rd -1501/-4th -1001/-4th -1001/-5 उत्तम योग/प्राणायाम/मुद्रा किंवा उत्तम स्पष्टीकरण उत्कृष्ट स्पष्टीकरण - ५०१/-उत्कृष्ट स्पष्टीकरण - ५०१/-उत्कृष्ट स्पष्टीकरण - ५०१/-उत्तम सादरीकरण - ५०१/-उत्तम सादरीकरण - ५०१/-सत्तर वर्षांवरील सर्वोत्कृष्ट स्पर्धक - 301/-सात वर्षांखालील सर्वोत्कृष्ट स्पर्धक - 300/-स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी, खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहा. https://youtu.be/sBIUQY0l0oU

(नोंदणी मोफत आहे) स्पर्धेच्या नोंदणीसाठी खालील माहिती पाठवणे आवश्यक आहे तुमचे नाव:-तुमचा पत्ता :-तुमचे वय:-तुझा व्यवसाय :-स्पर्धेची विषय:-

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा -डॉ. अमित भोरकर 7218332218 

टीप- स्पर्धेत काही अडचण आल्यास बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे असतील.

English Summary: Participate in yoga competitions and win, 11,111 prizes World Yoga Day Special 2022
Published on: 24 May 2022, 02:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)