पपई एक स्वादिष्ट फळ आहे, यामध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यास खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. मात्र असे असले तरी पपई ही सकाळच्या नाश्त्याच्या वेळी खाल्ली तर त्यापासून अधिक लाभ मिळत असतो. पपई हे चवीला खुपच गोड आणि स्वादिष्ट असल्याने याचे अनेक लोक सेवन करत असतात. पपई खाणे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते कारण त्यात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते आणि त्यामध्ये असलेले हे विटामिन काही प्रमाणात वजन कमी करण्यास देखील मदत करतात. आपण पपई कधीही खाऊ शकता, पपई नेमक्या याच वेळी खावे असे काही बंधन नाही. परंतु जर पपई सकाळी विशेषता नाष्टा च्या वेळी जर खाल्ली तर त्यापासून आपल्या शरीराला चांगली ऊर्जा मिळते तसेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पपई आपल्या शरीरासाठी सर्वात फायदेशीर असलेल्या फळांपैकी एक आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पपई खाण्याचे फायदे.
सकाळी नाश्ता मध्येच का खावी पपई
पपई आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते, याव्यतिरिक्त पपई हे फळ कमी ऍसिडिक असते म्हणून जर आपण पपई नाश्त्याच्या वेळी खाल्ली तर हे आपल्या पाचन तंत्र साठी खूपच फायदेशीर ठरते. जर आपले पाचन तंत्र व्यवस्थित राहिले तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो व शरीरात दिवसभर ऊर्जा बनलेली असते.
पपई खाण्याचे फायदे- वजन कमी करण्यास मदत करते - सकाळी पपईचे सेवन करणे मानवी आरोग्यासाठी चांगले असते कारण पपई मध्ये 80% पाणी असते. पपई मध्ये पण पाण्याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात फायबर देखील असतात, ज्यामुळे शरीरातील चयापचय दर वाढण्यास मदत होते.
त्वचेच्या टोनसाठी चांगले- जर आपण न्याहारीमध्ये पपई सेवन करत असाल तर यामुळे तुमच्या त्वचेचा रंग उजळतो, पपई मानवी त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. पपई मानवी त्वचा चमकदार बनवण्यास मदत करत असते. आपण आपल्या त्वचेवर पपईची पेस्ट देखील लावू शकता, यामुळे देखील ग्लो येतो परंतु पपई खाणे पेस्ट लावण्यापेक्षा जास्त चांगले आहे.
केस वाढण्यास मदत करते- पपई फळ केसांसाठी खुप चांगले असते कारण की यामुळे आपल्या केसात कोंडा तयार होत नाही. पपई सेवन केल्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि यामुळे मानवी केसांची नैसर्गिक चमक राखते.
Disclaimer: हा लेख सल्ल्यासह केवळ सामान्य माहिती प्रदान करतो. या लेखात दिलेली माहिती कोणताही पात्र वैद्यकीय सल्ला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Published on: 13 February 2022, 03:04 IST