मित्रांनो आपणही जर व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर, हा व्यवसाय सुरु करा आणि कमवा बक्कळ कमाई. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल आपणांस सांगणार आहोत तो व्यवसाय आहे पापड मेकिंग बिजनेस. हा व्यवसाय कोणीही सुरु करू शकतो, जर आपण जॉब करत असाल आणि एक्सट्रा इनकम हवी असेल किंवा आपण गृहिणी असाल आणि तुम्हाला व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर हा व्यवसाय आपल्यासाठी एक वरदान सिद्ध होईल.
पापड मेकिंगचा बिजनेस सुरु करण्यासाठी आपल्याकडे भांडवल पुरेसं नसेल तर यासाठी आपल्याला प्रधानमंत्री मुद्रा योजना अन्वये लोन सुद्धा मिळू शकते. ह्या व्यवसायासाठी आपणांस जवळपास चार लाखाचे मुद्रा लोन उपलब्ध होऊ शकते. पापड मेकिंग बिजनेस सुरु करणे खुपच सोपे आहे आणि यासाठी लागणाऱ्या इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर आपणास जवळपास 6 लाख रुपये अंदाजित खर्च येऊ शकतो, जर समजा आपणास 4 लाखाचे सरकारी कर्ज मिळाले तर आपणास फक्त उर्वरित 2 लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील. ह्या व्यवसायासाठी नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन या संस्थेने एक प्रोजेक्ट रिपोर्ट देखील तयार केला आहे ज्याचा उपयोग करून आपण सहजरीत्या लोन प्राप्त करून घेऊ शकता.
पापड मेकिंग बिजनेसची संपूर्ण माहिती
नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशनच्या प्रोजेक्ट रिपोर्ट नुसार जर आपण सहा लाख रुपये गुंतवणूक करून हा बिजनेस उभारला तर आपणांस 30 हजार किलोग्रामची प्रॉडक्शन तयार होईल. ह्या व्यवसायासाठी लागणाऱ्या सहा लाख रुपयात बिजनेससाठी लागणार वर्किंग कॅपिटल तसेच फिक्स कॅपिटल देखील समाविष्ट केले गेलेले आहे.
फिक्स कॅपिटलमध्ये बिजनेससाठी लागणारे दोन मशीन, पॅकेजिंग मशीन यासारख्या सर्व खर्चाचा समावेश होतो. वर्किंग कॅपिटलमध्ये कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार, पापड बनवण्यासाठी लागणारा तीन महिन्यांचा कच्चा माल आणि उपयुक्तता उत्पादन खर्च यांचा समावेश केला आहे. तसेच ह्या सहा लाखात भाडे, वीज, पाणी, टेलिफोन बिल आदी खर्चासुद्धा समावेश आहे.
पापड मेकिंग बिजनेससाठी लागणारे मशीन आणि प्रॉफिट
जर आपण पापड मेकिंग बिजनेस सुरु करण्याच्या विचारात असाल तर आपल्याला काही मशीनची गरज भासणार आहे.
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी स्विफ्टर, दोन मिक्सर, प्लॅटफॉर्म बॅलन्स, इलेक्ट्रिकली ओव्हन, मार्बल टेबल टॉप, चकल्या रोल, ऍल्युमिनियमची भांडी आणि रॅक यासारखी उपकरणे लागतील यांना येणारा खर्च हा फिक्स कॅपिटल मध्ये जोडण्यात आला आहे. याशिवाय आपल्याला व्यवसाय सुरु करण्यासाठी जागेची गरज भासेल, जागा तुम्ही भाडेतत्वावर सुद्धा घेऊ शकता आणि बिजनेस सुरु करू शकता. ह्या व्यवसायात आपण पाच लाख रुपये खर्च केलेत तर आपणांस 35 हजार महिन्याचे राहु शकतात.
Published on: 27 November 2021, 09:20 IST