Others News

मोठी कारखान्याची जागा, कर्मचारी वर्ग, एखादे मोठे ऑफिस म्हणजेच उद्योग नव्हे. उद्योगांमध्ये अनेक छोटे-मोठे व्यवसाय असतात जे तुम्ही घरी बसून देखील करू शकता. घरी बसून म्हणजे व्यवसायाची सुरुवात अगदी तुम्ही तुमच्या घरातून देखील करू शकतात व तीही अगदी कमीत कमी गुंतवणूक करून. असे भरपूर व्यवसाय आहेत, कमी गुंतवणुकीत घरातून सुरू करता येतात व चांगला नफा देतात. अशाच एका बाजारपेठेत चांगली मागणी असणाऱ्या व्यवसायाबद्दल या लेखात माहिती घेऊ.

Updated on 31 July, 2022 4:28 PM IST

मोठी कारखान्याची जागा, कर्मचारी वर्ग, एखादे मोठे ऑफिस म्हणजेच उद्योग नव्हे. उद्योगांमध्ये अनेक छोटे-मोठे व्यवसाय असतात जे तुम्ही घरी बसून देखील करू शकता. घरी बसून म्हणजे व्यवसायाची सुरुवात अगदी तुम्ही तुमच्या घरातून देखील करू शकतात व तीही अगदी कमीत कमी गुंतवणूक करून. असे भरपूर व्यवसाय आहेत, कमी गुंतवणुकीत घरातून सुरू करता येतात व चांगला नफा देतात. अशाच एका बाजारपेठेत चांगली मागणी असणाऱ्या व्यवसायाबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 पापड उद्योग

 पापड बनवण्याचा व्यवसाय तुम्ही अगदी तुमच्या घरातून सुरू करू शकतात व यासाठी लागणारी गुंतवणूक अगदी कमीत कमी असते. या व्यवसायामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही तयार केलेल्या पापड चवदार आणि इतर कंपन्यांच्या पापड पेक्षा जरा थोडासा वेगळा जरी असेल तरी तुमचे बाजारपेठेमध्ये चांगले नाव होऊ शकत.

नक्की वाचा:Banana Processing: कच्च्या केळीपासून तयार करा 'हा' पदार्थ,शेतकऱ्यांना मिळेल दुप्पट नफा

पापड उद्योगाच्या बाबतीत राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला असून त्यानुसार विचार केला तर या मध्ये मुद्रा योजनेचा आधार घेऊन चार लाख रुपयांचे कर्ज स्वस्त दरात उपलब्ध होते.

त्यासोबतच एकूण सहा लाख रुपयांचे गुंतवणूक करून तुम्ही तीस हजार किलो उत्पादन क्षमता निर्माण करू शकतात व यासाठी लागणारी जागा ही 250 चौरस मीटर इतके लागणार आहे. सगळी गुंतवणूक आहे यामध्ये तुमचे वर्किंग कॅपिटल वगैरे सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे.

अहवालाचा विचार केला तर तुमच्या स्थिर भांडवलामध्ये दोन मशीन, पापड पॅकेजिंग मशिन  आणि खेळत्या भांडवलामध्ये तीन महिन्यांचा कर्मचाऱ्यांचा पगार, लागणारा कच्चामाल आणि तीन महिन्यांसाठी लागणारा उत्पादन खर्च यांचा समावेश होतो. याशिवाय जागा भाड्याने असेल तर जागा भाडे, वापर केलेले विजेचा खर्च, पाण्याचा तसेच टेलिफोन बिल इत्यादी कारणांचा देखील समावेश आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो श्रीमंत होयचंय ना! झिरो बजेटमध्ये सुरु करा कुकुटपालन व्यवसाय; बनाल लाखोंचे मालक

या व्यवसायात लागणारे आवश्यक गोष्टी

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 200 ते 250 चौरस फूट जागा तसेच 3 अकुशल आणि दोन कुशल कामगारांची आवश्यकता असते. हे सगळं सुरू करण्यासाठी तुम्हाला एकूण चार लाख रुपयांचे कर्ज मिळेल आणि तुमचे

स्वतःची गुंतवणूक सहा लाख रुपये असली म्हणजे तुम्ही हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात सुरू करू शकतात. या व्यवसायासाठी तुम्हाला कर्ज रूपाने आर्थिक मदत हवी असेल तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज दाखल करू शकतात व ही मिळालेली कर्जाची रक्कम तुम्ही पाच वर्षापर्यंत परतफेड करू शकतात.

नक्की वाचा:Pickle Making Bussiness: गुंतवा दहा हजार कमवा महिना 25 ते 30 हजार, वाचा सविस्तर माहिती

English Summary: papad making bussiness is most benificial bussiness (1)
Published on: 31 July 2022, 04:28 IST