Others News

मुंबई: मित्रांनो सध्या देशात सर्वत्र भीषण बेरोजगारी वाढली आहे, यासमवेतच देशातील नवयुवकांना आता नौकरी करण्याऐवजी व्यवसाय करणे अधिक सोयीचे वाटतं आहे, मात्र असे असले तरी पैशांच्या कमतरतेमुळे अनेक लोक आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकत नाही. जर तुम्ही देखील तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. ज्याद्वारे तुम्ही कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता आणि दरमहा लाखों रुपये कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला एका बिझनेस आयडियाबद्दल सांगत आहोत, ज्याची सुरुवात तुम्ही फक्त 2 लाख रुपयांपासून करू शकता विशेष म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करता येणारा हा व्यवसाय आपणास लाखो रुपये महिन्याकाठी कमवून देऊ शकतो.

Updated on 27 February, 2022 10:32 PM IST

या व्यवसायात सर्वात खास आणि विशेष गोष्ट अशी आहे की, जर आपणांस हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर आपण हा व्यवसाय सरकारच्या मदतीने सुरू करू शकता. सरकारी मदत घेऊन हा व्यवसाय कमी भांडवलात सुरु केला जाऊ शकतो आणि या व्यवसायातून तुम्ही दरमहा एक लाख रुपये पर्यंत कमवू शकता. मित्रांनो आम्ही ज्या व्यवसायबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे पापड मेकिंग बिजनेस, चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया या व्यवसायाविषयी.

पापड मेकिंग बिजनेस

मित्रांनो जर तुमच्याकडे 2 लाख रुपये एवढी रक्कम असेल तर आपण हा पापड मेकिंग बिजनेस सुरू करू शकता. जर तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल तर आपण राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाच्या एक प्रकल्प अहवाल अनुसार मुद्रा लोन अंतर्गत स्वस्त व्याजदरात 4 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

किती येणार टोटल खर्च

सरकारच्या या अहवालानुसार, आपण जर 6 लाख रुपयांची गुंतवणुक करून हा व्यवसाय उभारला तर आपण या व्यवसायातून सुमारे 30 हजार किलो पापडचे उत्पादन घेऊ शकता. एवढ्या उत्पादन क्षमतेचा व्यवसाय उभारण्यासाठी आपणांस 250 चौरस मीटर जागा आवश्यक असणार आहे. ह्या व्यवसायासाठी जे 6 लाख रुपये भांडवल लागणार आहे त्यात स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यांचा समाविष्ट करण्यात आला आहे. स्थिर भांडवलामध्ये दोन मशीन्स, पॅकेजिंग मशीन, इतर उपकरणे यांसारख्या सर्व खर्चाचा समावेश केला गेला आहे. खेळत्या भांडवलमध्ये कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांचे पगार, कच्चा माल आणि तीन महिन्यांतील उपयुक्तता उत्पादन खर्च यांचा समावेश होतो. याशिवाय भाडे, वीज, पाणी, टेलिफोन बिल आदी खर्चाचाही यात समावेश करण्यात आला आहे.

व्यवसायासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि जागा 

या व्यवसायासाठी तुमच्याकडे जागा असणे आवश्यक आहे.  जर तुमच्याकडे जागा नसेल तर ती आपण भाड्याने घेऊन देखील हा व्यवसाय उभारू शकता. भाड्याच्या जागेसाठी तुम्हाला दरमहा 5 हजार रुपयेपर्यंत भाडे द्यावे लागू शकते.  याव्यतिरिक्त व्यवसायासाठी 6 लोक आवश्यक असणार आहेत यामध्ये 3 अकुशल कामगार आणि 2 कुशल कामगार तसेच एक पर्यवेक्षक अनिवार्य असणार आहे. या लोकांच्या पगारावर सुमारे 25,000 रुपये खर्च महिन्याकाठी येणे अपेक्षित आहे, जे की खेळत्या भांडवलात जोडले गेले आहे.

English Summary: PAPAD MAKING BUSINESS IS VERY PROFIT EARNING KNOW MORE ABOUT THIS BUSINESS
Published on: 27 February 2022, 10:32 IST