Others News

भारतात आजच्या काळात पॅन कार्ड हे सर्व महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक कागदपत्र आहे. पॅन कार्डचा वापर सर्वाधिक वित्तीय कमांमध्ये केला जातो. विविध आर्थिक कारणांसाठी याचा वापर सामान्य बाब बनली आहे. मित्रांनो आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बँक खाते आणि कोणत्याही प्रकारचा छोटा किंवा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅन कार्डचा वापर आता अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे भारतीय नागरिकांसाठी पॅन कार्ड खूप महत्वाचे बनले आहे.

Updated on 09 May, 2022 10:08 PM IST

भारतात आजच्या काळात पॅन कार्ड हे सर्व महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक कागदपत्र आहे. पॅन कार्डचा वापर सर्वाधिक वित्तीय कमांमध्ये केला जातो. विविध आर्थिक कारणांसाठी याचा वापर सामान्य बाब बनली आहे. मित्रांनो आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बँक खाते आणि कोणत्याही प्रकारचा छोटा किंवा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅन कार्डचा वापर आता अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे भारतीय नागरिकांसाठी पॅन कार्ड खूप महत्वाचे बनले आहे.

पॅन कार्ड खूप उपयोगी कागदपत्र आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, पॅनकार्डबाबतची छोटीशी चूक तुमचे खूप नुकसान करू शकते. जर तुम्हीही पॅन कार्डशी संबंधित ही चूक केली तर सरकार तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावू शकते. चला तर मग या लेखात पॅन कार्डशी संबंधित चुकीची सविस्तर माहिती जाणुन घेऊया.

एकापेक्षा जास्त पॅनकार्ड ठेवल्यास दंड आकारला जाईल

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, आपल्या भारतात बहुतेक लोक एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरतात जे की साफ चुकीचे आहे. आयकर नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. जर त्या व्यक्तीकडे दुसरे पॅनकार्ड आढळले तर ते बेकायदेशीर मानले जाईल आणि त्याअंतर्गत कारवाई देखील केली जाईल.  त्यामुळे जर तुमच्याकडेही दोन पॅनकार्ड असतील तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

दोन पॅन कार्ड असल्यास, प्राप्तिकर तुमच्यावर मोठा दंड आकारू शकतो आणि आधार कार्डशी लिंक केलेले नसले तरीही तुमच्या बँक खात्याच्या सर्व सेवा बंद केल्या जातील.  यामुळे जर तुमच्याकडे देखील दोन पॅन कार्ड असतील तर तुम्हाला तुमचे दुसरे पॅन कार्ड लवकरात लवकर आयकर विभागाकडे जमा करावे लागेल.

तुम्ही बेकायदेशीररीत्या बनवलेले दुसरे पॅनकार्ड जमा न केल्यास, आयकर विभागाकडून वरील दंडासह कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत कारवाई केली जाईल. दंड म्हणून, तुम्हाला आयकर विभागामध्ये 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरावी लागू शकते.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! SBI बँक आपल्या ग्राहकांना देत आहे सोन्याचे कॉइन; काय आहे ही खास स्कीम जाणुन घ्या

Aadhar Card : फक्त 50 रुपयात बनवा PVC आधार कार्ड; कसं बनवणार वाचा

अशा प्रकारे दोन पॅन कार्ड बनून जातात

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अनेक वेळा पॅन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर बराच वेळ पॅन कार्ड येत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत लोक नकळत दुसऱ्या पॅनकार्डसाठी अर्ज करतात. त्यामुळे त्या व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड अनावधानाने येऊन जातात. जर तुमच्याकडेही अशाच प्रकारे बनवलेली दोन पॅनकार्डे असतील, तर आयकर विभागात दुसरे पॅन कार्ड वेळेत जमा करा नाहीतर तुम्हाला देखील दंड भरावा लागू शकतो तसेच कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.

दुसरे पॅन कार्ड कसे जमा करावे

जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर तुम्हाला दुसरे पॅन कार्ड आयकर विभागाकडे जमा करावे लागेल. यासाठी एखादी व्यक्ती ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आपले दुसरे पॅन कार्ड जमा करू शकते.

जर तुम्हाला दुसरे पॅन कार्ड ऑनलाइन पद्धतीने जमा करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथम आयकर विभागाच्या वेबसाइटवर जावे लागेल. जिथे तुम्हाला पॅन कार्ड सरेंडर फॉर्म डाउनलोड करावा लागेल. यानंतर तुम्हाला Request For New PAN Card/ Changes or Correction in PAN Data या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला तो NSDL वर ऑनलाइन सबमिट करावा लागेल.  जर तुम्ही ऑफलाइन जमा करणार असाल तर, तुम्ही NSDL कार्यालयात जाऊन देखील हा फॉर्म सबमिट करू शकता.

English Summary: Pan Card News: Action will be taken against those who use two PAN cards; Will have to pay ten thousand and… ..
Published on: 09 May 2022, 10:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)