Others News

भारतात पॅन कार्ड (Pan Card)एक महत्वाचे कागदपत्र आहे. पॅनकार्ड बँकिंग कामासाठी (For Banking Work) एक महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. पॅनकार्ड मुळे अनेक आर्थिक व्यवहार अटकून जातात. पॅनकार्ड आयकर (Income Tax) भरण्यासाठी एक महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. पॅनकार्डची उपयोगिता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि असे हे महत्वपूर्ण दस्ताऐवज पॅनकार्ड जर आपल्याकडून कुठे पडले असेल, हरवले असेल.

Updated on 21 October, 2021 2:40 PM IST

भारतात पॅन कार्ड (Pan Card)एक महत्वाचे कागदपत्र आहे. पॅनकार्ड बँकिंग कामासाठी (For Banking Work) एक महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. पॅनकार्ड मुळे अनेक आर्थिक व्यवहार अटकून जातात. पॅनकार्ड आयकर (Income Tax) भरण्यासाठी एक महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. पॅनकार्डची उपयोगिता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि असे हे महत्वपूर्ण दस्ताऐवज पॅनकार्ड जर आपल्याकडून कुठे पडले असेल, हरवले असेल.

 तर ही बातमी आपल्यासाठी खास आहे. आम्ही आज आपणांस पॅन कार्ड हरवल्यावर आपण ते कसे प्राप्त करू शकता ह्याविषयीं सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया पॅन कार्ड हरवल्यास परत ते कसे प्राप्त करायचे.

 हरवलेलं पॅनकार्ड कसे परत मिळवणार How To Get A Lost PAN Card Back

मित्रांनो जर आपलेही पॅन कार्ड हरवले असेल आणि तुम्हालाही नवीन पॅन कार्ड हवं असेल तर सर्व्यात आधी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड हरवल्याची तक्रार आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये करावी लागेल. आपण तक्रार केल्याशिवाय नवीन पॅनकार्ड साठी अर्ज करू शकत नाही त्यामुळे सर्व्यात आधी पोलीस स्टेशन मध्ये त्यासंबंधी तक्रार नोंदवावी. मित्रानो पॅन कार्ड हरवलं तर आपले वित्तीय व्यवहार ठप्प होऊ शकतात तसेच अन्य काही समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागू शकते. पण चिंतेच काही कारण नाही आता घरबसल्या तुम्हाला पॅनकार्ड हे मिळणार आहे. भारतीय इनकम टॅक्स डिपार्टमेंटने (Income Tax Department Of India) नुकतीच त्यांची एक ऑफिसिअल वेबसाईट (Official Website) तयार केली आहे. ज्याद्वारे आपण घरबसल्या केवळ काही मिनिटात आपले पॅन कार्ड मिळवू शकतात. ह्या ऑनलाईन भेटणाऱ्या पॅनकार्डला इ-पॅन (E-Pan) असे नाव देण्यात आले आहे. जे की आपल्या पॅनकार्ड प्रमाणेच असते आणि ज्याचा वापर हा सर्व्या कामात करता येतो

E-Pan काढण्यासाठी प्रोसेस

»E-Pan डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भारत सरकारच्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या incometax.gov.in  ह्या ऑफिसिअल वेबसाईटला भेट द्या.

»वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे इन्स्टंट इ पॅन (Instant E-Pan) नावाचे ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा.

»आता न्यू इ पॅन (New E-Pan) नावाच्या ऑपशन वर क्लिक करा

»ह्यानंतर आपला पॅनकार्ड नंबर (Pan Card Number) प्रवीष्ट करा.

»जर आपणांस आपला पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर आपण आधार क्रमांक (Aadhar Card Number) टाकू शकतात.

»इथे काही अटी व शर्ती दिलेल्या असतील त्या काळजीपूर्वक वाचा आणि ऍक्सेप्ट ह्या बटनवर क्लिक करा.

»

ह्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर (Registered Mobile Number) वर एक वन टाइम पासवर्ड अर्थात ओटीपी (OTP) येईल तो प्रविष्ट करा.

»आता कन्फर्म (Confirm) बटनवर क्लिक करा

»तुम्ही कन्फर्म करताच तुमचे पॅन PDF स्वरूपात तुमच्या ईमेल आयडीवर (Email ID) पाठवले जाईल. येथून तुम्ही तुमचे ई-पॅन डाउनलोड करू शकता.

»ह्यासाठी आपल्याला काही शुल्क देखील भरावी लागणार आहे. जवळपास 110 रुपये आपल्याला मोजावे लागतील. ह्याव्यतिरिक्त जर आपण परदेशात हे पॅन कार्ड मिळवायचे असेल तर आपल्याला 1011 रुपये मोजावे लागतील.

English Summary: pan card lost so dnt worry now you can download at home
Published on: 21 October 2021, 02:40 IST