Others News

पॅन कार्ड हे सगळ्या अत्यावश्यक कागदपत्रं पैकी एक आहे. कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार म्हणजेच बँक असो या म्युचल फंड किंवा कुठल्याही प्रकारचा स्ट्रोक घ्यायचा असेल किंवा सरकारी योजनांचा फायदा यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे

Updated on 06 January, 2022 5:15 PM IST

 पॅन कार्ड हे सगळ्या अत्यावश्यक कागदपत्रं पैकी एक आहे. कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार म्हणजेच बँक असो या म्युचल फंड किंवा कुठल्याही प्रकारचा स्ट्रोक घ्यायचा असेल किंवा सरकारी योजनांचा फायदा यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे

पॅन कार्ड धारकांना 31मार्च 2022 पर्यंत  त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड क्रमांकाची लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या दिलेल्या मुदतीपूर्वी तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार लिंक करणे गरजेचे आहे नाहीतर ते निष्क्रिय केले जाऊ शकते.आणि त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड आधार लिंक करण्यासाठी एक हजार रुपये द्यावे लागतील. तसेच जर तुम्ही पॅन कार्ड आधार ची लिंक केले नसेल तर अशी व्यक्ती म्युचल फंड, शेअर मार्केट तसेच बँक खाते उघडणे इत्यादी मध्ये गुंतवणूक करू शकणार नाहीत.

एवढेच नाही तर अशा व्यक्तीने दुसरे पॅन कार्ड तयार केले तर ते वैध नसेल. यासाठी आयकर कायदा 1961 च्या कलम 272  N अंतर्गत मूल्यांकन अधिकारी अशा व्यक्तीला दंड म्हणून दहा हजार रुपये भरावे लागतील अशा आशयाचा निर्देश देऊ शकतात.

 पॅन कार्ड आधार लिंक करण्याच्या ऑनलाईन पद्धती

  • त्यासाठी सर्वप्रथम इन्कम टॅक्सच्या संकेतस्थळावर जावे.
  • आधार कार्ड वर असलेल्या नावाप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाकावा.
  • आधार कार्ड मध्ये तुमच्या जन्माचे वर्ष दिले असल्यास चौकोनावर टीक करावे.
  • त्यानंतर कॅप्टचा कोड  टाकावा.
  • त्यानंतर लिंक आधार बटनावर क्लिक करावे.
  • अशा पद्धतीने तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार नंबर सिलिंग केले जाईल.

एसएमएसच्या माध्यमातून लिंककरायची पद्धत….

 यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर UIDPAN असे टाईप करावे लागेल व त्यानंतर बारा अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर दहा अंकी पेन क्रमांक टाकावा. आता चरण एक मध्ये नमूद केलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवावा.

English Summary: pan card link to adhar card is very important till 31 march 2022
Published on: 06 January 2022, 04:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)